Jacqueline Fernandez Sukesh Chandrasekhar
Jacqueline Fernandez Sukesh ChandrasekharSAAM TV

Jacqueline Fernandez : जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ; कोर्टाने पाठवलं समन्स

पटियाला कोर्टाने हे समन्स बजावलं आहे.
Published on

Jacqueline Fernandez Court Summons : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. २०० कोटींच्या मनी लँड्रिंग प्रकरणात जॅकलिनला आता कोर्टाने समन्स बजावलं आहे. माहितीनुसार पटियाला हाऊस कोर्टाने हे समन्स बजावलं असून तिला 26 सप्टेंबरपर्यंत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहे. (Jacqueline Fernandez Latest News)

Jacqueline Fernandez Sukesh Chandrasekhar
Karan Johar Angry : 'या' स्टार किडवर रागावला करण जोहर, थांबवले चित्रपटाचे शूटिंग

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचं नाव २०० कोटींच्या मनी लँड्रिंग प्रकरणात चांगलेच चर्चेत आलं होतं. ठग सुकेश चंद्रशेखर यांच्याशी तिचे नाव जोडलं गेले होते.

काही दिवसांपूर्वी ईडीने जॅकलिनची चौकशी सुद्धा केली होती. त्यानंतर ईडीने तिच्यावर 2015 कोटींचं आरोपपत्रही दाखल केलं होतं. सुकेश चंद्रशेखर प्रकरणात ईडीने पुरवणी आरोपपत्र दाखल केलं होतं. मात्र स्वतः वर लावण्यात आलेल्या आरोपांचं जॅकलिननं खंडन केलं होतं.

आरोपपत्रात सुकेश हा गुन्हेगार आणि खंडणीखोर असल्याची माहिती जॅकलिनला यापूर्वीच होती, असा दावा ईडीने केला आहे. दरम्यान, आता पटियाला हाऊस कोर्टाने जॅकलिनला समन्स बजावलं असून तिला 26 सप्टेंबरपर्यंत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com