अभिनेता विजय देवरकोंडाच्या कारचा अपघात झाला.
अपघातानंतर विजय देवरकोंडाने सोशल मीडियावर पहिली पोस्ट केली आहे.
विजय देवरकोंडाने आपले हेल्थ अपडेट दिले आहेत.
साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडाच्या (Vijay Deverakonda ) गाडीचा अपघात झाला आहे. तेलंगणामध्ये जोगुलांबा गडवाला येथे हा अपघात झाला. या अपघातात विजय देवरकोंडाला कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र गाडीचे देखील नुकसान झाले. अपघातानंतर विजय देवरकोंडाने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामधून त्याने आपले हेल्थ अपडेट देखील दिले आहेत. तो नेमकं काय म्हणाला, जाणून घेऊयात.
"सगळं ठीक आहे. गाडीला अपघात झाला, पण आम्ही सर्व ठीक आहोत. गेलो आणि स्ट्रेंथ वर्कआउट केला आणि आत्ताच घरी परतलो. माझे डोके दुखते पण बिर्याणी आणि झोप बरं करु शकत नाहीत अशी कोणतही गोष्ट नाही. तुम्हा सर्वांना मोठी मिठी आणि खूप प्रेम.. बातम्यांमुळे जास्त ताण घेऊ नका. "
विजय देवरकोंडाच्या या पोस्टवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. चाहते तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, विजय देवरकोंडाची कार दुसऱ्या गाडीला धडकली आणि अपघात झाला. ही घटना सोमवारी घडली. विजय देवरकोंडा आणि गाडीतील इतर कोणीही जखमी झाले नाही.
विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदानाने गुपचूप साखरपुडा केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच दोघे फेब्रुवारी 2026 मध्ये लग्न करणार असल्याचे बोले जात आहे. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही आहे. साखरपुड्याच्या बातमीनंतर विजय देवरकोंडाच्या अपघाताची माहिती मिळताच चाहत्यांना मोठा धक्का बसला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.