Sakshi Sunil Jadhav
दिवस कधी सुरू झाला कधी संपला कळणार नाही. इतकी धावपळ होईल. विनाकारण मनस्ताप वाढेल.
मित्र-मैत्रिणींच्या गराड्यामध्ये दिवस व्यस्त राहील. नवीन संधी येतील. दिवस लाभदायक असा आहे.
राजकारणही लोकांपासून फायदा आहे. चांगल्या लोकांच्यात ऊठबस होईल. वाणी आणि वक्तृत्वापासून नवे वलय प्राप्त होईल.
शिव उपासना करावी. मोठे प्रवास घडतील. भाग्यकारक घटना सहज घडताना दिसून येतील. दिवस चांगला आहे.
सरकारी काम करताना व्यत्यय येण्याची शक्यता आहे. वेगवान वाहनांपासून स्वतःची काळजी घ्या. मोठे धनलाभ होतील.
तुमच्या बाजूने कोर्टकचेरी मध्ये पुढाकार घ्याल. काही गोष्टी सकारात्मक दिसून येतील. व्यवसायामध्ये वृद्धी होईल.
स्त्रियांना स्त्रीरोग विषयक अडचणी सतावतील. नोकरीमध्ये धावपळ, जीव ओतून काम कराल. आपले शत्रू वाढते राहतील.
कुलस्वामिनीची उपासना करावी. क्रीडा क्षेत्रात विशेष प्रगती होईल. एकट्यानेच कामे करावी लागतील.
कौटुंबिक सोहळा एखादा अनुभवाल. घरात धार्मिक कार्य होईल. नवीन वस्तूंची खरेदी होईल. दिवस चांगला आहे.
प्रेमामध्ये लाभ होतील. जवळचे प्रवास घडतील. शेजाऱ्यांकडून मदत होईल. लेखक, प्रकाशक, कवी कलाकार यांना दिवस चांगला आहे.
आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा. आपल्यामुळे कोणी दुखावले जाणार नाही ना याची काळजी घ्या. तेलकट खाण्याची तलफ येईल.
स्वतःचाच आनंद शोधण्याचा प्रयत्न करा. इतरांना आपल्यापासून नवीन उर्मी जाणवेल. उत्साहाने कार्यरत रहाल.