Kesari Chapter 2 Vicky Kaushal Role Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kesari Chapter 2 : 'केसरी चॅप्टर २' मध्ये विकी कौशलची खास भूमिका; अभिनेत्याच्या कामामुळे प्रेक्षक भावूक

Kesari Chapter 2 Vicky Kaushal Role: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा 'केसरी चॅप्टर २' हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात विकी कौशल देखील एका महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

Shruti Vilas Kadam

Kesari Chapter 2 Vicky Kaushal Role: अक्षय कुमार, आर. माधवन आणि अनन्या पांडे यांचा 'केसरी चॅप्टर २' हा चित्रपट १८ एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या अगदी सुरुवातीलाच प्रेक्षकांना एक खास नाव दिसते ते म्हणजे छावा फेम विकी कौशल. हो, चित्रपटाच्या सुरुवातीला विशेष आभार म्हणून विकीचे नाव पाहून लोक आश्चर्यचकित झाले आणि विकीने या चित्रपटात काय काम केले आहे असा प्रश्न विचारत आहेत.

खरंतर, 'केसरी चॅप्टर २' हा जालियनवाला बाग हत्याकांडावर आधारित कोर्टरूम ड्रामा आहे. दिग्दर्शक करण सिंह त्यागी यांनी या वेदनादायक ऐतिहासिक घटनेचे अतिशय संवेदनशील पद्धतीने चित्रीकरण केले आहे. या चित्रपटाची कथा रघु पलट आणि पुष्पा पलट यांनी संयुक्तपणे लिहिलेल्या 'द केस दॅट शूक द एम्पायर' या पुस्तकावर आधारित आहे.

विकी कौशलने साकारली महत्त्वाची भूमिका

चित्रपटात विकी कौशल दिसत नसला तरी त्याचा आवाज चित्रपटाचा आत्मा बनला आहे. जालियनवाला बाग हत्याकांडाची कहाणी विकीच्या आवाजात ऐकून प्रेक्षकांचे अंगावर काटा येतो. चित्रपटाच्या सुरुवातीच्या भागात, जेव्हा ब्रिटीश जनरल डायर त्याच्या सैनिकांसह नि:शस्त्र लोकांवर गोळीबार करतो, तेव्हा विकीच्या आवाजात ते दृश्य आणखी प्रभावी होतात. त्याचा आवाज प्रेक्षकांना त्या वेदनादायक घटनेच्या जवळ घेऊन जातो.

चित्रपटाचे कौतुक होत आहे

चित्रपटाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत 'केसरी चॅप्टर २' प्रेक्षकांच्या भावनांना हेलावून टाकतो. पहिल्या १० मिनिटांमधील कोरिओग्राफी आणि हत्याकांडाचे दृश्ये हृदयद्रावक आहेत. चित्रपटाचे खरे नाट्य कोर्टरूममध्ये उलगडते, जिथे भारत विरुद्ध ब्रिटिश सरकार यावर वादविवाद होतो. आर. माधवन आणि अक्षय कुमारचा दमदार अभिनय आणि अनन्या पांडेची भावनिक बाजू देखील लोकांना आवडू लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनासाठी मार्गस्थ

Fighting Viral Video: कारमध्ये बसवून धू धू धुतलं, आधी मुलीनं मारलं; नंतर मित्रानेच ९० सेकंदात २६ वेळा तरुणाच्या कानशिलात लगावल्या| पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: मथुरेत पावसाचा हाहाकार, यमुना नदीचे पाणी घरात शिरलं

Gold Rate Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याचे दर वाढले; १० तोळ्यामागे ८,७०० रुपयांनी वाढ, वाचा आजचे भाव

Fruits For Kidney : आहारात या ६ फळांचा समावेश केल्यास मूत्रपिंडासाठी ठरतील वरदान, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT