Katrina Kaif Pregnancy SAAM TV
मनोरंजन बातम्या

Katrina Kaif Pregnancy : "मुलगा असेल की मुलगी असेल गं?" कतरिना कैफच्या प्रेग्नेंसी बद्दल ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी

Katrina Kaif Pregnancy Prediction : कतरिना कैफ आणि विकी कौशल लवकरच आई-बाबा होणार आहेत. त्यांना मुलगी होणार की मुलगा? याबाबत प्रसिद्ध ज्योतिषांनी भविष्यवाणी केली आहे.

Shreya Maskar

कतरिना कैफ आणि विकी कौशल लवकरच आई-बाबा होणार आहेत.

कतरिना आणि विकीने सप्टेंबर महिन्यात प्रेग्नेंसीची गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे.

कतरिना आणि विकीला मुलगी होणार की मुलगा? याबाबत प्रसिद्ध ज्योतिषांनी भविष्यवाणी केली आहे.

बॉलिवूडची क्युट जोडी विकी कौशल (Vicky Kaushal ) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif Pregnancy ) लवकरच आई-बाबा होणार आहेत. सप्टेंबर महिन्यात त्यांनी ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. तेव्हा पासून चाहते विकी-कतरिनाच्या बाळासाठी खूप उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे. कतरिनाने बेबी बंप फ्लॉन्ट करत विकी कौशलसोबतचा फोटो शेअर केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कतरिना कैफ ऑक्टोबर महिन्यात बाळाला जन्म देणार आहे. अशात आता कतरिना-विकीला मुलगा होणार की मुलगी यावर सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

ज्योतिषी अनिरुद्ध कुमार मिश्रा यांनी कतरिना कैफच्या प्रेग्नेंसी बद्दल मोठी भविष्यवाणी केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून कतरिना-विकीला मुलगा होणार की मुलगी याचा खुलासा केला आहे. त्यांच्या भविष्यवाणीनुसार कतरिना आणि विकीला मुलगी होणार आहे. त्यांनी विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नाचा फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिलं की, "विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचे पहिले अपत्य मुलगी असेल..." याची चर्चा सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

ज्योतिषी अनिरुद्ध कुमार मिश्रा यांनी यापूर्वी देखील करीना कपूर खान- सैफ अली खान आणि अनुष्का शर्मा-विराट कोहली यांच्या प्रेग्नेंसी बद्दल भविष्यवाणी केली होती. जी खरी ठरली. त्यांच्या भविष्यवाणीत असे होते की, अनुष्का शर्मा मुलीला आणि करीना कपूर दुसऱ्या मुलाला जन्म देईल. विकी कौशल आणि कतरिना कैफला मुलगी होणार की मुलगा हे लवकरच आपल्याला समजेल.

विकी कौशल - कतरिना कैफ

विकी कौशल आणि कतरिना कैफने 2021 मध्ये लग्नगाठ बांधली आहे. लग्नाच्या 4 वर्षांनी ही दोघे आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत करणार आहेत. विकी कौशल आणि कतरिना कैफ बॉलिवूडचे पावर कपल आहे. यांच्या अभिनयाचे चाहते दिवाने आहेत. त्यांनी आजवर अनेक हिट चित्रपट केले आहेत. विकी कौशलचा 'छावा' चित्रपट खूप गाजला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनमाडमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शानदार पथ संचालन

Saturday Horoscope: मिथूनसह ५ राशींचे मन अस्वस्थ राहिल! नुकसान होईल, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Pune Tourism : महाराष्ट्रात राहून परदेशाचा अनुभव घ्यायचाय? मग दिवाळीच्या सुट्टीत पुण्याजवळील 'हे' ठिकाण पाहाच

Horoscope: आजचा दिवस आनंद, सुख समृद्धीचा; ६ राशींच्या जीवनात घडणार मोठा बदल, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

पुणे पोलिसांचा दणका! निलेश घायवळनंतर सख्खा भाऊ सचिनवरही मकोका, VIDEO

SCROLL FOR NEXT