Famous Actress Death SAAM TV
मनोरंजन बातम्या

Famous Actress Death : सिनेसृष्टीचा तेजस्वी तारा हरपला; ज्येष्ठ अभिनेत्रीचे निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

Famous Actress Passed Away : मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेत्रीचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले. अभिनेत्रीची कारकिर्दीबद्दल जाणून घेऊयात.

Shreya Maskar

मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. तमिळ चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री वत्सला राजगोपाल (Vatsala Rajagopal) यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले आहे. तमिळ चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली. वत्सला राजगोपाल या प्रामुख्याने आजीच्या भूमिकांसाठी ओळखल्या जात होत्या. चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांमध्ये आपल्या दमदार कामगिरीने त्यांनी प्रेक्षकांना आपलसे केले.

Filmibeat च्या वृत्तानुसार, अभिनेत्री वत्सला राजगोपाल यांचे ३० ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे निधन झाले. वत्सला राजगोपाल यांचे वृद्धापकाळाशी संबंधित आजारांमुळे निधन झाले. अभिनेत्री वत्सला राजगोपाल यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच त्यांच्या निधनाची बातमी समजताच कलाकार आणि चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

वत्सला राजगोपाल यांनी वयाच्या ६० व्या वर्षी मणी रत्नम यांच्या 'रोजा' चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तिरुवनंतपुरममध्ये जन्मलेल्या आणि वाढलेल्या वत्सला यांना शालेय जीवनापासूनच नृत्य आणि नाटकाची आवड होती. लग्नानंतर १९५३ मध्ये त्या चेन्नईला स्थायिक झाल्या आणि त्यांनी 'अकाउंटंट जनरल'च्या कार्यालयात लिपिक म्हणून काम केले. 'रोजा', 'सती लीलावती', 'अन्नियन' आणि 'मोळी' यांसारख्या अनेक लोकप्रिय तमिळ चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले.

वत्सला राजगोपाल यांनी अभिनय पदार्पणानंतर 400 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.'साथी लीलावती', 'रिदम', 'विनर', 'अन्नियां', 'पट्टियाल', 'धाम धूम', 'मोझी' आणि 'कल्याण समयाल साधम' या चित्रपटांचा समावेश आहे. छोट्या पडद्यावर 'चिठ्ठी', 'आनंदम', 'मुंधनई मुदिचू' आणि 'वसंतम' या मालिकेद्वारे ती अभिनेत्री म्हणून लोकप्रिय झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: निलेश राणेंच्या ‘लायकी’च्या टीकेला नवनाथ बन यांचे उत्तर

Census 2027: मोठी बातमी! केंद्र सरकारकडून जनगणनेच्या तारखा जाहीर, कधीपासून सुरू होणार प्रक्रिया? वाचा संपूर्ण वेळापत्रक

Hill Station : मुंबई-पुण्यापासून जवळच आहे 'हे' सुंदर हिल स्टेशन, आताच प्लान करा दिवाळी व्हेकेशन

Rain Update : पाऊस थैमान घालणार! हवामान खात्याचा १७ राज्यांना अलर्ट; महाराष्ट्रात कसं असेल वातावरण?

Saturday Horoscope : या 6 राशींच्या नशिबात धनलाभाचे योग, कोणाला मिळणार आनंदाची बातमी? वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT