Famous Actor Death SAAM TV
मनोरंजन बातम्या

Famous Actor Death : तेजस्वी तारा हरपला; प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, सिनेसृष्टी शोकसागरात

Famous Actor Passes Away : प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन झाले आहे. मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली. यूट्यूब क्षेत्रातही अभिनेत्याचे मोठे नाव आहे.

Shreya Maskar

मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध दिग्गज अभिनेते आणि चित्रपट समीक्षक सत्येंद्र (Satyendra) यांचे निधन झाले. सत्येंद्र यांच्या निधनाने तमिळ चित्रपटसृष्टी आणि यूट्यूब विश्वावर शोककळा पसरली आहे. चाहते, कलाकार मंडळी आणि सोशल मीडियावरील नेटकऱ्यांनी अभिनेत्यावर श्रद्धांजली वाहिली आहे. चाहते आणि चित्रपटसृष्टीतील सदस्य सोशल मीडियावर त्यांच्या जाण्याबद्दल हळहळ व्यक्त करत आहेत.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून सत्येंद्र यांची प्रकृती चिंताजनक होती. अभिनेत्याने चेन्नईतील रोयापेट्टा सरकारी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पोलिसांनीही त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मूळचे बंगळुरूचे असलेले सत्येंद्र हे केवळ चित्रपटांमधील अभिनयासाठीच नव्हे, तर यूट्यूबवरील त्यांच्या चित्रपट समीक्षेच्या अनोख्या शैलीसाठीही ओळखले जात होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोयापेट्टा सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच सत्येंद्र यांचे निधन झाले. 'सिनेमा विकटन'ला मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालय प्रशासन सध्या बंगळुरू येथील त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांचा मृतदेह रुग्णालयाच्या शवगृहात ठेवण्यात आला आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सत्येंद्र यांचे करिअर

सत्येंद्र यांनी 'एझवाथू मनिथन', 'मन्न वासनाई' आणि 'कदमई कन्नियम कट्टुपाडू' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी अनेक टिव्ही मालिकांमध्येही काम केले. तसेच त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक आणि खलनायकाच्या भूमिकाही साकारल्या होत्या. यूट्यूबवरील त्यांच्या चित्रपट समीक्षेमुळे ते तरुण प्रेक्षकवर्गात अधिक लोकप्रिय झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मनसेच्या किल्लेदारांनी मुंबईच्या महापौर तावडेंवर फेकली वही, VIDEO

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! भरधाव बसची महिलेला धडक, चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, तडकाफडकी राजीनामा देत बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT