avm saravanan death  Saam tv
मनोरंजन बातम्या

सिनेसृष्टीला आणखी एक मोठा धक्का; प्रसिद्ध निर्माता काळाच्या पडद्याआड

avm saravanan death : दक्षिण सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. सिनेसृष्टी गाजवणारे प्रसिद्ध निर्माते सरवनन काळाच्या पडद्याआड गेले आहेत.

Vishal Gangurde

दक्षिण सिनेसृष्टीला मोठा धक्का

निर्माते ए व्ही एम सरवनन यांचं निधन

ए व्ही एम सरवनन यांनी वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

M Saravanan Death : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर दक्षिण सिनेसृष्टीतून दु:खद घटना समोर आली आहे. निर्माते आणि एव्हीएम स्टुडिओचे मालक ए व्ही एम सरवनन यांचं गुरुवारी निधन झालं. त्यांनी वयाच्या ८६ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांनी चेन्नईत गुरुवारी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे वडील एम व्ही मइयप्पन यांनी १९४५ साली ए व्ही एम स्टुडिओची स्थापना केली. तर एम सरवनन यांनी अनेक प्रसिद्ध सिनेमांचे निर्माते होते. यात 'शिवाजी द बॉस' या सिनेमाचाही समावेश आहे.

८६ वर्षीय एम सरवनन हे गेल्या अनेक दिवसांपासून अनेक आजारांशी सामना करत होते. एम सरवनन यांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या निधनाविषयी माहिती दिली. एम सरवनन यांचा एव्हीएम स्टुडिओ भरपूर जुना स्टुडिओ आहे.

निर्माता एम सरवनन यांनी त्यांच्या कार्यकाळात समसरम अधु मिनसरम, मिनसरा कनवु, वेट्टईकरन, आयन आणि नानुम ओरू पेन सारखे अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यांनी त्यांच्या कामाने अनेकांना प्रेरणा दिली आहे. २००७ साली प्रदर्शित झालेला 'शिवाजी द बॉस' हा सिनेमा त्यांच्या कार्यकाळातील सर्वात हिट सिनेमा मानला जातो. या सिनेमाने रजनीकांत यांनाही मोठ्या उंचीवर नेऊन पोहोचवलं.

'शिवाजी द बॉस' हा सिनेमा १८ वर्षांपूर्वी बाजारात आला होता. २००७ साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाची निर्मिती ही एम सरवनन यांनी एम एस गुहान यांच्या साथीने केली होती. तर या सिनेमाचं दिग्दर्शन एस शंकर यांनी केलं होतं.

रिपोर्टनुसार, 'शिवाजी द बॉस' हा सिनेमाचं बजेट ५०-६० कोटी रुपये इतकं होतं. तर या सिनेमाने १५० कोटी रुपयांची कमाई केली होती. रजनीकांतच्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. 'शिवाजी द बॉस' या सिनेमात रजनीकांत यांच्यासोबत श्रिया सरन यांनी काम केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Valache Birde Recipe: अस्सल पारंपारिक पद्धतीचा वालाचा बिरडा कसा बनवायचा?

Kalyan : कल्याणमध्ये कायदा सुव्यवस्था धाब्यावर; नशखोरांची घरात घुसून दुकानदार दाम्पत्याला मारहाण

Maharashtra Live News Update : पनवेलजवळ मालगाडी रुळावरून घसरली; रेल्वे वाहतूक काही काळ विस्कळीत

कल्याण-डोंबिवलीकरांनो सावध राहा; ग्रामीण पट्ट्यात बिबट्याची एन्ट्री, नागरिक दहशतीत

राज्यातील सर्व शाळा उद्या बंद; पुण्यात उद्या शिक्षक शिक्षकेतर संघटनेचा एल्गार

SCROLL FOR NEXT