Veteran Playback Singer S Janaki Passes Away Saam Tv
मनोरंजन बातम्या

Famous Singer Death: भारतीय संगीत विश्वाचा जादुई आवाज हरपला; ज्येष्ठ गायिका काळाच्या पडद्याआड

Famous Singer Death: 'दक्षिण भारताची कोकिळा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका एस. जानकी यांचे निधन झाले. 20 भाषांमध्ये 48 हजारांहून अधिक गाणी गाऊन त्यांनी भारतीय संगीतविश्वात अजरामर ठसा उमटवला.

Shruti Vilas Kadam

Singer Death: भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ गायिका आणि 'दक्षिण भारताची कोकिळा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एस. जानकी यांचे निधन झाले. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे भारतीय संगीतविश्वावर शोककळा पसरली असून, चाहते आणि कलाविश्वातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. 'जानकी अम्मा' म्हणून प्रसिद्ध असलेल्या या दिग्गज गायिकेने आपल्या मधुर आवाजाने अनेक पिढ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले.

एस. जानकी यांचा जन्म 23 एप्रिल 1938 रोजी आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील रेपाल्ले तालुक्यातील पल्लापाटला येथे झाला. त्यांचे वडील आयुर्वेदिक डॉक्टर होते. लहानपणापासूनच त्यांना संगीताची आवड होती. अवघ्या नवव्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा रंगमंचावर गायन सादर केले. त्यानंतर त्यांनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले आणि आपल्या गायकीला खऱ्या अर्थाने सुरुवात केली.

वयाच्या 20 व्या वर्षी एका नातेवाईकाच्या सल्ल्यानुसार त्या चेन्नईला गेल्या. तेथे संगीतकार आर. सुदर्शनम यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. 1957 मध्ये 'विधीयिन विळयाट्टू' या तमिळ चित्रपटातून त्यांनी पार्श्वगायिका म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर जवळपास सहा दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.

एस. जानकी यांनी तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम, हिंदीसह सुमारे 20 भाषांमध्ये तब्बल 48 हजारांहून अधिक गाणी रेकॉर्ड केली. त्यांच्या आवाजाने दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीसह संपूर्ण भारतीय संगीतविश्व समृद्ध झाले. विविध भाषांतील त्यांच्या गाण्यांनी त्यांना देशभरात प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. त्यांच्या उत्कृष्ट योगदानासाठी त्यांना चार वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत 'सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका' हा सन्मान मिळाला. याशिवाय अनेक राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले. एस. जानकी यांच्या निधनाने भारतीय संगीतविश्वाने एक अजरामर स्वर गमावला आहे. त्यांच्या हजारो गाण्यांमधून त्यांचा आवाज कायम रसिकांच्या स्मरणात राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT