Bhootam Bhayam: नशिब बदलणारा 'परीस' की नव्या संकटांची सुरुवात? 'भूतम् भयम्'चा दमदार ट्रेलर रिलीज

Bhootam Bhayam Trailer: 'भूतम भयम्' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून रहस्यमय 'परीसा', हॉरर-कॉमेडी, ऑरेंज ज्यूस गँगची टीम आणि दमदार कलाकारांमुळे चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
Bhootam Bhayyam
Bhootam BhayyamPR
Published On

Bhootam Bhayam Trailer: आगामी मराठी हॉरर-कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'चा बहुप्रतीक्षित ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. हॉरर-थीमवर सजवलेल्या खास सेटवर हा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला. ट्रेलरमधील रहस्य, थरार, विनोद आणि रहस्यमय 'परीसा'ची कथा यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

ट्रेलरमध्ये सात बेरोजगार मित्रांच्या आयुष्यात अचानक आलेल्या एका रहस्यमय 'परीसा'ची कथा पाहायला मिळते. हा परीस त्यांच्या आयुष्याला कलाटणी देईल, असे वाटत असतानाच त्यांच्या समोर अनेक संकटे उभी राहतात. या गूढ वस्तूच्या शोधात ते एकटे नसल्याचे समजल्यानंतर सुरू होणारी जीवघेणी शर्यत, अजब घटना आणि विनोदी प्रसंग ट्रेलरला वेगळीच रंगत आणतात. हा परीस त्यांच्या नशिबाला सोन्याचा स्पर्श देणार की संकटात लोटणार, याचे उत्तर चित्रपटातून मिळणार आहे.

Bhootam Bhayyam
Actor Death: मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा मुंबईत पेट्रोल पंपावरच मृत्यू; नेमकं काय घडलं

या चित्रपटात सोशल मीडियावर लोकप्रिय असलेले सौरभ घाडगे, शुभम जाधव, सिद्धांत सरफरे, नील साळेकर आणि करण सोनावणे हे पाच कंटेंट क्रिएटर्स पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. त्यांच्यासोबत पुष्कराज चिरपुटकर आणि मनमीत पेम यांच्या भूमिका देखील महत्त्वाच्या आहेत. कलाकारांचा सहज अभिनय आणि कॉमिक टायमिंग ट्रेलरमधून उठून दिसते.

Bhootam Bhayyam
Kamali Serial: कमळीच्या आयुष्यात मोठा ट्विस्ट! आई जिवंत असल्याचं सत्य येणार समोर; पण, कामिनी रचणार विषाचा कट

दिग्दर्शक रामचंद्र अरुण गांवकर यांनी हा चित्रपट रहस्य, विनोद आणि अनपेक्षित घटनांनी भरलेला असल्याचे सांगितले. तर निर्माते नरेन कुमार आणि महेश ज्ञानदेव कोरडे यांनी प्रेक्षकांना वेगळा सिनेमॅटिक अनुभव देण्याचा प्रयत्न केल्याचे नमूद केले. झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर यांनीही हॉरर-कॉमेडी आणि नव्या कलाकारांची ऊर्जा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, असा विश्वास व्यक्त केला. झी स्टुडिओज प्रस्तुत आणि कायरा कुमार क्रिएशन्स निर्मित 'भूतम भयम्' या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन रामचंद्र अरुण गांवकर यांनी केले आहे. रहस्य, थरार आणि विनोदाचा संगम असलेला हा चित्रपट २४ जुलै रोजी राज्यभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com