Shanta Tambe Passes Away Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shanta Tambe Passes Away: ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे काळाच्या पडद्याआड, ९० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Shanta Tambe Death: ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे यांची वयाच्या ९० व्या वर्षी प्राणज्योत मालवली.

Chetan Bodke

Shanta Tambe Passed Away At Age Of 90: मराठी मनोरंजन विश्वातून एक दु:खद बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे यांची वयाच्या ९० व्या वर्षी प्राणज्योत मालवली. ज्येष्ठ अभिनेत्री यांच्या निधनामुळे मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. शांता तांबेनी आपल्या सिनेसृष्टीतील प्रवासाची सुरूवात नाटकातून केली आहे. आपल्या दर्जेदार भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात त्यांनी खोलवर छाप पाडली होती.

शांता तांबेंनी सिनेसृष्टीत पदार्पण केल्यानंतर अनेक दिग्गज दिग्दर्शकांसोबत काम केले होते. त्या दिग्गज दिग्दर्शकांच्या यादीत भालजी पेंढारकर (Bhalji Pendharkar), दिनकर पाटील (Dinkar D. Patil), अनंत माने (Anant Mane) यांच्यासह अनेक दिग्गज दिग्दर्शकांसोबत त्यांनी एकत्र काम केले.

त्यांनी मोहित्यांची मंजुळा, सवाल माझा ऐका, मोलकरीण, बाई मोठी भाग्याची, मर्दानी सहित अनेक चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. घरची परिस्थिती हालाखिची असल्याने शांता तांबेंनी चित्रपटात काम करण्याचे ठरवले होते. शांता तांबे यांच्या दोन बायका फजिती ऐका, चांडाळा चौकडी, असला नवरा नको गं बाई या चित्रपटांमधील भूमिकाही गाजल्या.

सात दशकं अभिनय क्षेत्र गाजवल्यानंतर त्यांनी उतार वयात अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला. त्या कोल्हापुरातील त्यांच्या घरी राहत होत्या. त्या अलीकडेच ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत दिसल्या. या मालिकेत त्यांनी छोटी भूमिका साकारली होती. शांता तांबे यांच्या निधनानं मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अनेक कलाकरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: राज्यात पावसाचा हाहाकार, हिंगोलीत २ जणांचा मृत्यू

Mumbai University Exam: मुंबई विद्यापीठाच्या 32 परीक्षा पुढे ढकलल्या; या तारखेला घेण्यात येणार | VIDEO

Maharashtra Rain Alert: पुढचे २४ तास महत्त्वाचे! मुंबई, ठाणे, रायगडला रेड अलर्ट; गरज असेल तरच बाहेर पडा

School Holiday Today: पावसाची जोरदार बॅटिंग; मुंबई, ठाण्यासह 'या' ठिकाणी शाळांना सुट्टी; वाचा सविस्तर

Horoscope: घरात येईल सुख-समृद्धि; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस ठरेल लाभकारी, जाणून घ्या राशीभविष्य

SCROLL FOR NEXT