Famous Actress Death SAAM TV
मनोरंजन बातम्या

Famous Actress Death : सिनेसृष्टीला मोठा धक्का! प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन, कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

Famous Actress Passed Away : मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्रीचे निधन झाले. अभिनेत्रीच्या कारकीर्दीबद्दल जाणून घेऊयात.

Shreya Maskar

प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्रीचे निधन

अभिनेत्रीच्या निधनाने कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

चाहत्यांनी वाहिली श्रद्धांजली

सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्रीचे दुःखद निधन झाले. 'सुदानी फ्रॉम नायजेरिया' या चित्रपटातील 'उम्मा'च्या भूमिकेसाठी ओळखल्या जाणाऱ्या मल्याळम अभिनेत्री सावित्री श्रीधरन (Savithri Sreedharan) यांचे निधन झाले आहे. चित्रपटसृष्टीत ठसा उमटवण्यापूर्वी त्यांनी रंगभूमीवरील आपल्या दमदार अभिनयाने ओळख निर्माण केली होती.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अभिनेत्री सावित्री श्रीधरन यांचे वयोमानाशी संबंधित आजारांमुळे त्यांचे निधन (२३ सप्टेंबर २०२६) झाले. अभिनेत्रीच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.कलाविश्वातील एक हरहुन्नरी तारा हरपला. अभिनेत्रीच्या निधनाची बातमी समजताच कलाकार आणि चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेत्रीने वयाच्या ८४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

२०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सुदानी फ्रॉम नायजेरिया' या चित्रपटात त्यांनी 'जमीला'ची भूमिका साकारली होती, जी 'उम्मा' म्हणून लोकप्रिय झाली. त्यांच्या या अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये 'विशेष उल्लेख' आणि 'सर्वोत्कृष्ट चरित्र अभिनेत्री'चा केरळ राज्य चित्रपट पुरस्कार मिळाला. त्यांच्या नाट्यप्रवासात के.टी. मोहम्मद यांच्या 'कलिंगा' तसेच कोझिकोड चिरंथना, संगमम आणि स्टेज इंडिया यांसारख्या नाट्यसंस्थांशी त्यांचा सहभाग होता.सावित्री श्रीधरन यांनी एम.टी. वासुदेवन नायर दिग्दर्शित 'कडावू' या चित्रपटाद्वारे पडद्यावर पदार्पण केले. या चित्रपटात त्यांनी आईची भूमिका साकारली आणि हळूहळू त्या मल्याळम चित्रपटसृष्टीतील एक परिचित चेहरा बनल्या.

सावित्री श्रीधरन यांनी दोनदा 'सर्वोत्कृष्ट नाट्य कलाकार'चा केरळ राज्य पुरस्कार जिंकला. त्यांना १९७७ आणि १९९३ मध्ये हा सन्मान मिळाला. तसेच, २००९ मध्ये नाटकातील योगदानाबद्दल त्यांना 'केरळ संगीत नाटक अकादमी पुरस्कार' देऊन गौरवण्यात आले.'व्हायरस' या थ्रिलर चित्रपटातील त्यांच्या अभिनयालाही प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांच्या फिल्म क्रेडिट्समध्ये 'वलियांगडी', 'ब्रेकफास्ट', 'द मँगो पीपल', 'डाकिनी', 'मेरा नाम शाजी', 'मोहब्बतीन कुंजाबदुल्ला' आणि 'इट्टीमानी: मेड इन चायना' यांचा समावेश आहे. नंतर त्या 'ओरू कदाथू कथा', 'आईस ओरठी', 'पाडा', 'मदपल्ली युनायटेड', 'पाप्पन', 'मी हूम मूसा' आणि 'क्रिस्टी' यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस अमरावती विमानतळावर दाखल

T20 Mumbai League: T20 मुंबई लीगमध्ये नवव्या टीमची भर; नवी मुंबईच्या खेळाडूंना आता मिळणार मोठी संधी

Banana Benefits: केळी खाल्ल्याने वजन वाढते की कमी होते? जाणून घ्या

Ritu Tawade : मुंबईच्या महापौर रितू तावडेंना दणका, सत्र न्यायालयाने ठोठवला दंड

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, 10 तोळा 15,200 रुपयांची स्वस्त; 18K- 22K आणि 24K चे दर किती?

SCROLL FOR NEXT