Bharat Kapoor Passes Away saam tv
मनोरंजन बातम्या

Bharat Kapoor Passes Away: ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते भरत कपूर यांचे निधन; 'या' आजारामुळे घेतला अखेरचा श्वास

Bharat Kapoor Passes Away: बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते भरत कपूर यांचे वयाच्या 80व्या वर्षी निधन झाले आहे. या कारणामुळे त्यांचे निधन झाल्याची माहिती अभिनेते अवतार गिल यांनी दिली.

Shruti Vilas Kadam

Bharat Kapoor Passes Away: बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते भरत कपूर यांचे वयाच्या 80व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात असून, अनेक कलाकार आणि चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भरत कपूर यांचे निधन कार्डिअॅक अरेस्ट आणि मल्टिपल ऑर्गन फेल्युअरमुळे मुंबईतील सायन रुग्णालयात सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास झाले. सोमवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले असून, त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या जवळच्या मित्रांनी आणि अभिनेते अवतार गिल यांनी ही माहिती दिली आहे. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नसल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले आहे.

भरत कपूर हे बॉलिवूडमधील एक अनुभवी आणि बहुपरिचित कलाकार होते. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये खलनायक आणि सहाय्यक भूमिकांमधून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. ‘नूरी’, ‘अखरी रास्ता’, ‘राम बलराम’, ‘इंकार’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या होत्या. त्यांच्या दमदार आवाजामुळे आणि प्रभावी अभिनयामुळे ते प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहिले.

चित्रपटांसोबतच त्यांनी दूरदर्शन मालिकांमध्येही काम केले होते. 90 च्या दशकात त्यांनी अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम करत त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. रंगभूमीवरही त्यांचा ठसा उमटला होता, त्यामुळे ते एक सर्वांगसुंदर कलाकार म्हणून ओळखले जात. त्यांच्या निधनानंतर बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी शोक व्यक्त केला आहे. भरत कपूर यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीतील एक अनुभवी आणि गुणी कलाकार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : दसऱ्याआधी सोनं स्वस्त झालं की महागले? २४, २२, १८ कॅरेटचे ताजे दर आले समोर

Surya Namaskar: १०,००० पावले, सायकलिंग किंवा जिम विसरा; 'हा' व्यायाम आहे लय भारी

Maharashtra News Live Update: अमरावती विद्यापीठात बॅटरीच्या स्फोटाने आग; तीन दुचाकी जळून खाक

Fenugreek Seeds: वजन ते शुगर कंट्रोल...; मेथीच्या दाण्यांचे हे ९ अद्भूत फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

Long Hair Care Tips For Women: केसांच्या वाढीसाठी घरगुती उपाय, मेथी आणि तांदळाचा हेअर सीरम लावा

SCROLL FOR NEXT