Famous Actress Death Saam tv
मनोरंजन बातम्या

Actress Death : सिनेसृष्टीला दुहेरी धक्का, प्रसिद्ध अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; चाहत्यांवर शोककळा

Famous Actress Death : सिनेसृष्टीला आज बुधवारी दुहेरी धक्का बसला आहे. ज्येष्ठ अभिनेत्यानंतर अभिनेत्री काळाच्या पडद्याआड

Vishal Gangurde

पंकज धीर यांच्या पाठोपाठ मधुमती यांचे निधन

विंदू दारा सिंग यांनी दिवंगत मधुमती यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली

ज्येष्ठ अभिनेत्री मधुमती नृत्यप्रेमी, शिक्षक आणि अनेक कलाकारांच्या मार्गदर्शक होत्या

१९ व्या वर्षी त्यांनी दीपक मनोहर यांच्याशी विवाह केला होता

Madhumati Death : सिनेसृष्टीला दुहेरी धक्का बसला आहे. बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर यांच्या निधनानंतर ज्येष्ठ अभिनेत्री मधुमती यांचं निधन झालं. अभिनेते विंदू दारा सिंह यांनी ज्येष्ठ अभिनेत्री मधुमती यांच्या निधनाची वार्ता दिली. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट श्रद्धांजली व्यक्त केली आहे. 81वर्षीय अभिनेत्री मधुमती यांच्या निधनाने चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.

विंदू दारा सिंह यांनी पोस्ट करत म्हटलं की, 'मधुमती आमच्या शिक्षिका, मित्र आणि मार्गदर्शक होती. त्या फक्त माझ्या नव्हे, तर अक्षय कुमार, तब्बू आणि इतर हजारो कलाकारांच्या मार्गदर्शक राहिल्या आहेत. त्या आमच्या संपर्कात असायच्या. त्या विद्यार्थ्यांचं प्रेम आणि काळजीने निरोगी जीवन जगल्या'.

अभिनेते विंदू म्हणाले, 'आज सकाळी त्या उठल्या. त्यावेळी ग्लास पाणी प्यायलं. त्यानंतर कायमच्या झोपी गेल्या. आम्ही एका जवळल्या व्यक्तीला गमावलं आहे. सिनेमातील त्यांचं नृत्य कायम लक्षात राहील'. मधुमती यांना जगण्यासाठी खाणे, पिणे आणि श्वास घेण्याइतकंच डान्स देखील आवश्यक होता. त्यांचा जन्म ३० मे १९४४ रोजी मुंबईतील पारसी कुटुंबात झाला. त्यांचे वडील न्यायाधीश होते.

मधुमती यांना लहानपणापासून न्यृताची आवड होती. त्यामुळे त्यांना अभ्यासात फारशी रुची नव्हती. त्यांनी नृत्याचा अभ्यास केला. त्यानंतर अनेकांना नृत्य शिकवलं. मधुमती यांची तुलना ज्येष्ठ अभिनेत्री हेलन यांच्याशी केली जाते.

मधुमती यांनी दीपक मनोहर यांच्याशी लग्न केलं होतं. मधुमती यांच्यापेक्षा वयाने अधिक ज्येष्ठ असलेले दीपक मनोहर यांना ४ मुले होती. दीपक मनोहर यांच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं होतं. त्यानंतर मधुमती आणि दीपक यांचं सूत जुळलं. दोघांच्या लग्नाला मधुमती यांच्या आईचा विरोध होता. त्यामुळे मधुमती यांनी आईच्या विरोधात जाऊन दीपक यांच्याशी लग्न केलं. लग्नावेळी मधुमती यांचं वय अवघं १९ होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मंत्र्यांची मालामाल खाती, निवडणुकीसाठी? कोण जिरवणार मंत्र्यांची मस्ती?

Maharashtra Live News Update: मनमाड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० ची निवडणूक स्थगित

Thursday Horoscope: ५ राशींचा पाण्यासारखा पैसा होणार खर्च, काहींचे होतील वाद, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Ayushman Bharat: ५ लाख नाही तर १० लाखांपर्यंत मोफत उपचार; कोणत्या कुटुंबांना होणार फायदा? वाचा सविस्तर माहिती

पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, मेट्रोचं जाळं विस्तारणार; 31 किमी लांबीच्या २ मार्गिका अन् २८ स्थानके

SCROLL FOR NEXT