Dr. Girish Oak Father Passes Away Saam TV
मनोरंजन बातम्या

Girish Oak: ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक यांना पितृशोक; पोस्ट शेअर करत वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा

Girish Oak Share Post: गिरीश ओक यांनी सोशल मीडियावर वडिलांचा फोटो शेअर केला आहे.

Pooja Dange

Dr. Girish Oak Father Passes Away:

ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक यांच्या वडिलांनाच निधन झाले आहे. डॉ, गिरीश ओक यांचे वडील रत्नाकर दिनकर ओक ९३ वर्षाचे होते. वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. गिरीश ओक यांनी पोस्ट शेअर करत वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

गिरीश ओक यांनी सोशल मीडियावर वडिलांचा फोटो शेअर केला आहे. त्या फोटोसह त्यांनी कॅप्शनमध्ये लिहित वडीलांचे निधन झाले असल्याचे सांगितले आहे.

गिरीश ओक यांची पोस्ट

गिरीश ओक यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, काल माझे बाबा ती. रत्नाकर दिनकर ओक यांचं वयाच्या ९३ व्या वर्षी वृध्दत्वामुळे निधन झालं. प्रत्येक मुलाचे/मुलीचे वडील हे त्याचे पहिले हिरो असतात तसेच तेही माझे होतेच.

माझ्यात ज्या काही थोड्याफार तथाकथित बऱ्या सवयी गोष्टी आहेत त्या त्यांच्यामुळेच. ते इलेक्ट्रिकल इंजिनिअर होते आणि महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात चीफ इंजिनिअर या पदावरून ते १९८९ साली निवृत्त झाले. त्यांनी त्यांच्या हयातीत कधीही भ्रष्टाचार केला नाही.

या व्यतिरिक्त त्यांना अनेक गोष्टी अवगत होत्या. त्यांना संस्कृत फ्रेंच जर्मन स्पॅनिश, गुजराती, उर्दू इतक्या भाषा यायच्या ते शिवणकाम आणि स्वयंपाक उत्तम करायचे. कपड्यांना इस्त्री, सायकल, स्कूट,र घड्याळं घरातल्या जवळ जवळ सगळ्याच उपयोगाच्या वस्तूंचं सर्विसींग दुरूस्ती तेच करायचे. तेव्हा मी त्यांना असिस्ट करायचो त्यामुळे त्या गोष्टी मीही शिकलो.

माझी आई गंमतीनी म्हणायची ती,मी आणि बहीण यांना नटबोल्ट नाहीत नाहीतर त्यांनी आम्हालाही उघडून आमचं सर्विसींग केलं असतं. अर्थात ते त्यांनी न उघडताच केलं. ते बासरी आणि माउथ ॲार्गन छान वाजवायचे ते त्यांनी मला शिकवायचा प्रयत्नही केला पण मीच कंटाळा केला.रोज नियमीत सूर्यनमस्कार आणि प्राणायाम करणं मी त्यांच्यामुळेच शिकलो.

अन्नाची, पाण्याची, विजेची नासाडी त्यांना अजिबात खपत नसे या गोष्टींची किंमत मला त्यांच्यामुळेच कळली.काय काय आणि किती सांगू.आखीर बाप बाप होता है और बेटा बेटा.

बाबा तूम्ही खूप सकारात्मक व्यासंगी आनंदी आयुष्य जगलात. तुम्ही खूप शांत संयमी होतात आणि अगदी तसेच जातानाही तुम्ही आम्हाला कोणालाही त्रास न देता शांतपणे गेलात.

मला आणि सौ. पल्लवीला शेवटी तुमची सेवा करता आली हे आम्ही आमचं भाग्य समजतो.

तुम्हाला सतत वेगवेगळ्या कामात व्यस्त असणं आवडायचं देव तुम्हाला तसंच व्यस्त ठेवो म्हणजे तुम्ही आनंदी रहाल.

ती. बाबा शिरसाष्टांग नमस्कार.'

अभिनेते गिरीश ओक 'अग्गबाई सासूबाई', 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकांमध्ये काम केले आहे. डॉ. गिरीश ओक यांचे ३८ कृष्ण व्हिला हे नाटक देखील रंगभूमीवर सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Death: पोलीस दलात आत्महत्येचं सत्र काही थांबेना! ४ दिवसात ३ आत्महत्या, काय आहे कारण?

Mahalaxmi Vrat 2025 : महालक्ष्मी व्रताची तारीख, पूजा विधी, महत्व घ्या जाणून

Maharashtra Live News Update: ते वक्तव्य करून अजित पवारांकडून मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न; राम शिंदेंचा आरोप

Gunfire Shooting : क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार! तिघांचा जागीच मृत्यू, आठजण जखमी

Astro Tips: सकाळी उठल्यावर आरशात पाहणे शुभ असते की अशुभ?

SCROLL FOR NEXT