Kiara Advani Video: राम चरण आणि राणा दग्गुबतीने कियाराची घेतली शाळा; कलाकारांचा व्हिडीओ व्हायरल

Ram Charan - Kiara Advani Movie: कियाराने २०१९ मध्ये आलेला तेलगू चित्रपट विनया विधेया रामा या चित्रपटामध्ये राम चरणसोबत काम केले आहे.
Kiara Advani, Ram Charan And Rana Daggubati
Kiara Advani, Ram Charan And Rana Daggubati Facebook FilmFare

Kiara Advani Old Video Get Viral:

कियारा अडवाणी, राम चरण आणि राणा दग्गुबती यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. राणा दग्गुबतीच्या चॅट शोमध्ये कियारा आणि राम चरण पाहुणे कलाकार म्हणून उपस्थित होते.

कियाराने २०१९ मध्ये आलेला तेलगू चित्रपट विनया विधेया रामा या चित्रपटामध्ये राम चरणसोबत काम केले आहे. दरम्यान राणा कियारा अडवाणीचे जनरल नॉलेज तपासून पाहिले. तिला दक्षिण भारताविषयी काही प्रश्न विचारले.

Kiara Advani, Ram Charan And Rana Daggubati
Seema Deo Passed Away: ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे वृद्धपकाळाने निधन; सिनेसृष्टीवर शोककळा

व्हायरल होत असल्रल्या व्हिडीओमध्ये राणा दग्गुबती, राम चरणला सांगत असतो की, 'उत्तर भारतातील काही अभिनेत्री आहेत त्यांना तेलगू ही भाषा आहे हे देखील माहित नाही. मी अशा अभिनेत्रींसोबत काम केले आहे. किनारा याला उत्तर देत म्हणते, 'मला वाटत नाही बाहुबलीनंतर असं कोणी असेल ज्याला तेलगूविषयी माहित नसेल.'

कियाराच्या या उत्तरानंतर राम चरण तिला लगेच प्रश्न करतो, 'तूला दक्षिण भारतातील चार राज्य आणि भाषा माहीत आहेत का?' कियारा उत्तर देत म्हणते, 'हो मला माहीत आहे.

कियाराच्या या उत्तरानंतर राम चरण तिला लगेच प्रश्न करतो, 'तूला दक्षिण भारतातील चार राज्य आणि भाषा माहीत आहेत का?' कियारा उत्तर देत म्हणते, 'हो मला माहीत आहे. तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू.'

कियारा केरळविषयी सांगायला विसरते. त्यावर दोघेही अभिनेते तिला त्याची आठवण करून देतात.

या व्हिडीओवर कमेंट करत एका यूजरने लिहिले की, “ती 5 राज्ये आहेत, नाही का? आणि 4 भाषा. प्रश्न विचारत असताना कदाचित ते विसरले असतील." आणखी एक म्हणाला, "त्यांनी (हे दोन्ही अभिनेते) प्रेक्षकांसाठी हिंदी शिकण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे तुम्ही तिथे नियमितपणे काम करत असाल तर तुम्हाला किमान भाषा अवगत असाव्यात, मी ते नक्कीच शिकेन कारण परफॉर्मिंग आर्ट्स हा एक सखोल वैयक्तिक व्यवसाय आहे.

दरम्यान कियारा अडवाणी पुन्हा एकदा राम चरणसोबत स्क्रिन शेअर करण्यासाठी सज्ज झाली आहे. चित्रपटाला काही कारणांनी विलंब होत आहे. शंकर एका वेळी दोन चित्रपटांमध्ये काम करत असल्याने चित्रपटाला उशीर होतआहे. कमल हसनसह इंडियन २ आणि राम चरणसोबत गेम चेंजर या चित्रपटांमध्ये काम करत आहे.

गेम चेंजरमध्ये राम एका आयएएस अधिकाऱ्याची भूमिका साकारण्याची शक्यता आहे. या चित्रपटात अंजली, एसजे सूर्या, जयराम, समुथिराकणी, सुनील, श्रीकांत आणि नस्सर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. (Latest Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com