Marathi Actor Death: मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील बहुआयामी व्यक्तिमत्त्व, दिग्दर्शक व अभिनेता रणजीत पाटील यांचे काल दु:खद निधन झाले. ह्रद्यविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. तरुण वयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली असून अनेक कलाकार, दिग्दर्शक आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
रणजीत पाटील यांनी आपल्या कारकिर्दीत अभिनय आणि दिग्दर्शन या दोन्ही क्षेत्रांत ठसा उमटवला. रंगभूमीपासून चित्रपटांपर्यंत त्यांनी विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचे प्रेम मिळवले. त्यांच्या अभिनयात सहजता, प्रामाणिकपणा आणि वास्तववाद दिसून येत असे. विशेषतः सामाजिक विषयांवर आधारित कथा मांडण्यात त्यांची दृष्टी वेगळी होती.
दिग्दर्शक म्हणून रणजीत पाटील यांनी आशयघन विषयांना व्यावसायिक चौकटीत मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या दिग्दर्शनात माणसांच्या भावनांना केंद्रस्थानी ठेवणारी मांडणी आढळते. त्यामुळे त्यांची कलाकृती केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता समाजाला विचार करायला लावणारे ठरले.
रणजीत पाटील यांनी रंगभूमीवर गाजत असण्याऱ्या प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या 'जर तरची गोष्ट' या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. तसेच त्यांनी 'काळे धंदे' या वेब सिरीजमध्ये छोटी भूमिका साकारली होती. त्यांच्या पश्च्यात त्यांनी पत्नी, आई-वडिल असा परिवार आहे. त्यांच्यावर अंत्यविधी कोल्हापूर येथे होणार आहेत. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांनी दुःख व्यक्त केले.अनेक चाहत्यांनीही सोशल मीडियावर त्यांच्या आठवणी शेअर करत त्यांना भावपूर्ण निरोप दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.