Amruta Subhash Saam Tv
मनोरंजन बातम्या

Amruta Subhash: दुहेरी आयुष्याचा शोध घेणारा प्रवास...'; 'जारण' भयपटात अमृता सुभाष दिसणार थरारक रुपात

Amruta Subhash: 'जारण' या चित्रपटात चौकटीबाहेर जाऊन आव्हानात्मक भूमिका साकारणारी अभिनेत्री अमृता सुभाष महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून तिची विशेष चर्चा सुरु आहे.

Shruti Vilas Kadam

Amruta Subhash: हृषीकेश गुप्ते दिग्दर्शित 'जारण' या भयपटाचे पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाले. पोस्टर बघून प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न पडले असतानाच आता या चित्रपटातील एक चेहरा समोर आला आहे. या चित्रपटात हरहुन्नरी अभिनेत्री अमृता सुभाष महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. 'जारण' हा मानवी भावना आणि दुहेरी आयुष्याचा शोध घेणारा प्रवास असून यात अनेक रहस्ये लपली आहेत, जी प्रेक्षकांना थरारक अनुभव देतील.

प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये अमृता सुभाषच्या चेहऱ्यावर टाचण्या टोचलेल्या दिसत असून डोळे बरंच काही सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. हा पोस्टर पाहायला भयानक दिसत असून या पोस्टर मागील रहस्य चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच उलगडणार आहे.

या भूमिकेबद्दल अमृता सुभाष म्हणते, '' मला नेहमी असे वाटते की कलाकाराने एका विशिष्ट प्रकारच्या भूमिकेपुरताच मर्यादित राहू नये. मला नेहमीच प्रयोगशील राहायला आवडते. माझ्या इतर भूमिकांच्या तुलनेत अशी भूमिका मी आजवर कधीच साकारली नव्हती. ही भूमिका माझ्यासाठी तशी आव्हानात्मक होती. परंतु दिग्दर्शक आणि माझ्या सहकलाकारांच्या साहाय्याने माझे हे काम सोपे झाले. ज्यावेळी मी 'जारण'चे स्क्रिप्ट वाचले तेव्हाच हा चित्रपट करण्याचे ठरवले. माझ्या भूमिकेबद्दल मी आता जास्त काही सांगणार नाही, मात्र हे आवर्जून सांगेन, ही एक अशी रहस्यमय कथा आहे, जी प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवेल.''

ए अँड सिनेमाज एलएलपी प्रस्तुत आणि ए३ इव्हेंट्स अँड मिडिया सर्व्हिसेस निर्मित ‘जारण’ चित्रपट येत्या ६ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन हृषीकेश गुप्ते यांनी केले असून अमोल भगत आणि नितीन भालचंद्र कुलकर्णी 'जारण'चे निर्माते आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sneha Wagh: आता मुंबई आपलीशी वाटत नाही...; यूपीतून परत आल्यावर अभिनेत्री स्नेहा वाघ असं का म्हणाली?

High cholesterol symptoms: डोळ्यापासून-पायांपर्यंत...! पाहा शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यावर कोणत्या अवयवांमध्ये दिसतात लक्षणं?

Diwali Lakshmi Pujan: लक्ष्मीपूजनात राशीनुसार करा हे खास उपाय, भरपूर पैसा अन् सुख- समृद्धी मिळेल

Fraud Case : शिंदेसेनेच्या कार्यकर्त्याचा व्यावसायिकाला १३ लाखांचा गंडा, फसवणुकीचा प्रकार उघड, नेमकं काय घडलं ?

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भीषण आग, ६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT