ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
थंड पाण्यात भिजवलेला स्वच्छ कापड चेहऱ्यावर ठेवल्याने त्वचेला थंडावा मिळतो आणि जळजळ कमी होते. थेट बर्फ न लावता, बर्फ कापडात गुंडाळून वापरणे सुरक्षित आहे.
थंड किंवा कोमट पाण्याने अंघोळ केल्याने त्वचेची उष्णता कमी होते आणि घामामुळे होणारी चिळचिळ कमी होते. अंघोळीनंतर त्वचा पूर्णपणे कोरडी करणे आवश्यक आहे.
सुताची आणि सैलसर कपडे घालल्याने त्वचेला हवा मिळते आणि घाम सुकतो, ज्यामुळे उष्णतेचा त्रास कमी होतो.
ओट्स पाण्यात भिजवून त्याचा लेप चेहऱ्यावर लावल्यास त्वचेची जळजळ आणि खाज कमी होते. ओट्समध्ये असलेले घटक त्वचेला शांत करतात.
कॅलामाइन लोशन त्वचेवर लावल्यास खाज आणि जळजळ कमी होते. हे लोशन त्वचेला थंडावा देऊन आराम देते.
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी भरपूर पाणी आणि थंड पेये पिणे आवश्यक आहे. यामुळे शरीरातील तापमान नियंत्रित राहते.
सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत थेट सूर्यप्रकाशात जाणे टाळावे. बाहेर पडताना टोपी, सनग्लासेस आणि सनस्क्रीनचा वापर करावा.