ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हाळ्यात घाम आणि उष्णतेमुळे केस चिकट आणि कमकुवत होतात. अशा वेळी योग्य काळजी घेणं आवश्यक आहे. खाली दिलेल्या टिप्स तुमचे केस स्वच्छ, निरोगी आणि तजेलदार ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतील.
उन्हाळ्यात घामामुळे केस चिकट होतात, त्यामुळे आठवड्यातून २-३ वेळा सौम्य शँपूने केस धुणं आवश्यक आहे.
दही, अंडं, आणि लिंबाचा रस वापरून घरगुती केसांचे मास्क वापरा. यामुळे स्वच्छता आणि पोषण मिळते.
नारळ तेल, बदाम तेल वापरून हलकं मसाज केल्यास केस मजबूत राहतात आणि डोकं थंड राहतं.
उन्हात बाहेर जाताना केस झाकण्यासाठी स्कार्फ किंवा कॅप वापरा. यामुळे सूर्यकिरणांचा थेट परिणाम होणार नाही.
व्हिटॅमिन बी, सी, प्रथिने आणि पाणी यांचे भरपूर सेवन केल्यास केस आरोग्यदायी राहतात.
केस धुण्यासाठी कोमट किंवा थंड पाणी वापरा. गरम पाण्यामुळे केस कोरडे आणि कमकुवत होतात.