Shruti Vilas Kadam
चमकदार त्वचा मिळवण्यासाठी आपल्या आहारात खालील गोष्टींचा समावेश
अवोकाडोमध्ये विटामिन E आणि हेल्दी फॅट्स असतात, जे त्वचेला सॉफ्टनेस आणि ग्लो देतात.
पालकासारख्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये बीटा-कॅरोटीन आणि ल्यूटीन असते, जे त्वचेच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे.
सफेद तिळामध्ये कॅल्शियम, प्रोटीन, मॅग्नेशियम, कॉपर, आयर्न, झिंक आणि फायबर असते, जे त्वचेच्या आरोग्यासाठी लाभदायक आहे.
अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेच्या पेशींची दुरुस्ती करतात आणि त्वचेला पोषण देतात.
स्ट्रॉबेरी, ब्लुबेरी यांसारख्या बेरिजमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन C असतो, जो त्वचेला उजळवतो आणि डाग कमी करतो.
कोरफडीचा रस प्यायल्याने शरीरातून टॉक्सिन्स बाहेर फेकले जातात, ज्यामुळे त्वचा स्वच्छ, तजेलदार आणि हायड्रेटेड राहते.