Ventilator 2 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ventilator 2: प्रियंका चोप्रा आणखी एका मराठी चित्रपटाची करणार निर्मीती; १० वर्षापूर्वीचं आहे खास कनेक्शन

Ventilator 2: राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या व्हेंटिलेटर चित्रपटाचा सिक्वेल जाहीर झाला आहे. दहा वर्षांनंतर कामेरकर कुटुंब पुन्हा भेटणार असून राजेश मापुस्कर दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत.

Shruti Vilas Kadam

Ventilator 2: मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेला आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा ‘व्हेंटिलेटर’ चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तब्बल दहा वर्षांनंतर या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘व्हेंटिलेटर २’ या नव्या चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कामेरकर कुटुंबातील सदस्यांना मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. पहिल्या भागाला मिळालेले भरभरून प्रेम आणि लोकप्रियता पाहता सिक्वेलबद्दल चाहत्यांमध्ये आतापासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे.

दहा वर्षांपूर्वी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आलेल्या ‘व्हेंटिलेटर’ चित्रपटाने प्रेक्षकांना कधी हसवले, तर कधी रडवले. आपला माणूस रुग्णालयात असताना रुग्णालयाच्या परिसरात घडणारी ही कथा आणि त्यातील कामेरकर कुटुंबातील नातेसंबंध प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले होते. प्रत्येक व्यक्तिरेखेचा स्वभाव, त्यांच्यातील गंमतीशीर संवाद आणि भावनिक प्रसंग यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या स्मरणात राहिला. आता याच कुटुंबाची पुढची गोष्ट सांगण्यासाठी दिग्दर्शक राजेश मापुस्कर सज्ज झाले आहेत. ‘तेच सगळे कामेरकर, पुन्हा एकदा १० वर्षांनंतर… त्यांच्यातले काही गेले, काही राहिले… गेलेले हसतायत आणि राहिलेले…!’ अशा मिश्किल शब्दांत ‘व्हेंटिलेटर २’ची घोषणा करण्यात आली आहे. ‘घ्या रे घ्या सारे घ्या…’ ही टॅगलाईनही सध्या लक्ष वेधून घेत आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक राजेश मापुस्कर यांनी या सिक्वेलबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘व्हेंटिलेटर’ चित्रपटाशी त्यांच्या अनेक आठवणी आणि भावना जोडल्या गेल्या आहेत. दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा त्याच विश्वात परतताना आनंदासोबतच मोठी जबाबदारी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या चित्रपटाला प्रेक्षकांनी दिलेले प्रेम आजही त्यांच्या मनात ताजे असल्याचे त्यांनी सांगितले.

‘व्हेंटिलेटर २’चे लेखन आणि दिग्दर्शन राजेश मापुस्कर यांनी केले आहे. प्रियंका चोप्रा जोनस, डॉ. मधु चोप्रा आणि राजेश मापुस्कर या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरू होणार आहे. मात्र, चित्रपटातील कलाकार कोण असणार आणि तो कधी प्रदर्शित होणार, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे दहा वर्षांनंतर कामेरकर कुटुंबाच्या आयुष्यात नेमके काय घडणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharad Pawar Health Update: शरद पवारांना रूग्णालयातून डिस्चार्ज; आता प्रकृती कशी आहे?

Mega Block : ऐन सणासुदीत प्रवाशांचे मेगा हाल! रविवारी 'या' मार्गावर मेगाब्लॉक; वाचा वेळापत्रक

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगरमध्ये FDA ची मोठी कारवाई

मोठी बातमी! दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; कधीपासून सुरू होणार परीक्षा? पाहा वेळापत्रक

अभ्यंगस्नान करताना सर्वात आधी तेल लावावे की उटणे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT