Veen Doghatli Hi Tutena SAAM TV
मनोरंजन बातम्या

Veen Doghatli Hi Tutena : नव्या आव्हानांची सप्तपदी! लग्नानंतर कसा सुरू होणार समर-स्वानंदीच्या प्रेमाचा प्रवास? पाहा VIDEO

Samar Swanandi Grand Wedding Video : 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत समर-स्वानंदीचा शाही विवाह सोहळा पार पडत आहे. लग्नात समर-स्वानंदी अनोख्या पद्धतीने सप्तपदीची वचने घेतात.

Shreya Maskar

'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेला प्रेक्षकांकडून भरपूर प्रतिसाद मिळत आहे.

समर-स्वानंदीने अनोख्या पद्धतीने वचने घेतली आहेत.

समर-स्वानंदीचा शाही विवाह सोहळा गोव्यात पार पडत आहे.

'वीण दोघांतली ही तुटेना' (Veen Doghatli Hi Tutena) मालिकेत समर-स्वानंदीचा शाही विवाह सोहळा पार पडत आहे. गोव्याच्या किनाऱ्यावर समर-स्वानंदी लग्नबंधनात अडकले आहेत. आता समर-स्वानंदीच्या लग्नानंतर मालिकेत नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. याची एक झलक 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

प्रोमोमध्ये पाहू शकता की, गोव्याच्या किनाऱ्यावर समर-स्वानंदी सप्तपदी घेत असतात. तेव्हा दोघेही अनोख्या पद्धतीने सप्तपदीतील वचने घेतात. समर म्हणतो, "हा संसार नाहीच, ही तडजोड आहे." त्यानंतर स्वानंदी म्हणते, " तडजोड असली तरी माझ्यापरीने संसारासाठी मला जे काही करता येईल, ते सगळं करेन." पुढे समर म्हणतो, "यांनी इतका त्रास दिला आहे की तो मी आयुष्यभर विसरू शकत नाही", स्वानंदी म्हणते, "पण, इथून पुढे कुठलाही त्रास होणार नाही, याची नक्की काळजी घेईन मी." समर म्हणतो, "यांच्याकडून सहकार्याच्या अपेक्षा करणे चुकीचे आहे. फक्त भांडता येते." स्वानंदी म्हणते, "मी सहकार्य करण्याचा नक्की प्रयत्न करेन."

प्रोमो व्हिडीओला हटके कॅप्शन देण्यात आले आहे. लिहिलं की, "कसा होणार तडजोडीने झालेल्या लग्नाचा प्रेमापर्यंतचा प्रवास?" या प्रोमोनंतर प्रेक्षक मालिक पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहेत.'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत लग्नानंतर समर-स्वानंदीमध्ये प्रेम कसे खुलणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.'वीण दोघांतली ही तुटेना' मालिका झी मराठी वाहिनीवर संध्याकाळी 7:30 वाजता पाहायला मिळते.

समर-स्वानंदीच्या लग्नात अनेक अडथळे येतात. मात्र अखेर हा शाही विवाह सोहळा पार पडतो. मालिकेत मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता सुबोध भावे मुख्य भूमिकेत झळकले आहे. कार्यक्रमात अगदी खऱ्या आयुष्यात घडते तसे विधीवध लग्न होताना दिसले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Khaman Dhokla: घरच्या घरी बनवा सुरत स्टाईल मऊ , लुसलुशीत खमण ढोकळा

Maharashtra Live News Update: बोपोडी भूखंड अपहार प्रकरणाशी काहीच संबंध नसल्याचा शितल तेजवानी यांचा दावा

राजकीय समीकरणं बदलली, आगामी निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? VIDEO

दिल्ली स्फोटाचे महाराष्ट्रात कनेक्शन? पुण्यासह राज्यात ATS ची छापेमारी, ४ डॉक्टरांचा पर्दाफाश होणार

Mumbai News: सेप्टिक टँक साफ करताना मुंबईत मोठी दुर्घटना, एका कामगाराचा मृत्यू; दुसऱ्याची प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT