Varun Kapoor Divorce SAAM TV
मनोरंजन बातम्या

Varun Kapoor Divorce : आलिया भट्टसोबत काम केलेल्या अभिनेत्याचा घटस्फोट, १२ वर्षांचा संसार मोडला

Varun Kapoor And Dhanya Mohan Divorce : आलिया भट्टसोबत काम केलेल्या अभिनेत्याचा घटस्फोट झाला आहे. हा अभिनेता टिव्ही इंडस्ट्रीतला प्रसिद्ध चेहरा आहे.

Shreya Maskar

वरुण कपूर याने लग्नाच्या 12 वर्षांनी घटस्फोट घेतला आहे.

वरुण कपूरने 'गंगूबाई काठियावाड़ी' चित्रपटात आलिया भट्टसोबत काम केले होते.

वरुण कपूर आणि धान्या मोहन विभक्त झाले आहेत.

मनोरंजनसृष्टीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. लोकप्रिय कपलचा घटस्फोट झाला आहे. टिव्ही अभिनेता वरुण कपूरने लग्नाच्या 12 वर्षांनी बायको धान्या मोहनसोबत घटस्फोट घेतला (Varun Kapoor And Dhanya Mohan Divorce) आहे. वरुण कपूर आणि धान्या मोहन विभक्त झाले आहेत. आजवर अभिनेत्याने अनेक सुपरहिट मालिकांमध्ये काम केले आहे. त्याच्या अभिनयाचे चाहते दिवाने आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, दोन आठवड्यांपूर्वी वरुण कपूर आणि धान्या मोहनच्या घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाली. वरुण कपूरने धान्या मोहनसोबत 2013 मध्ये लग्नगाठ बांधली. वरुण आणि धान्याचा घटस्फोट दोन आठवड्यांपूर्वी झाला आहे. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. "वरुण आणि धान्याला एकमेकांसाठी पुरेसा वेळ देता येत नव्हता. धान्या नेहमी प्रवास करत असते आणि मी शूटिंगमध्ये व्यस्त असतो. मला कधीतरी वाटते की मी सिंगल आहे. मी एकटा घर सांभाळायचो." अशी माहिती अभिनेत्याने एका मुलाखतीत दिली होती.

चित्रपटात काम

वरुण कपूरने संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात काम केले आहे. वरुण कपूरने 'गंगूबाई काठियावाड़ी' चित्रपटात बॉलिवडूची अभिनेत्री आलिया भट्टसोबत ( Alia Bhatt) काम केले होते. त्याला या चित्रपटामुळे खूप लोकप्रियता मिळाली. 2022 मध्ये 'गंगूबाई काठियावाड़ी' (Gangubai Kathiawadi) चित्रपट रिलीज झाला. ज्यात वरुण कपूर छोट्या भूमिकेत झळकला. त्याने चित्रपटात आलिया भट्टच्या प्रियकराची भूमिका साकारली आहे. जो तिचे आयुष्य क्षणात बदलून टाकतो.

वरुण कपूर वर्कफ्रंट

वरुण कपूर टिव्ही विश्वातला प्रसिद्ध चेहरा आहे. त्याने 'स्वरागिनी', 'सावित्री देवी कॉलेज अँड हॉस्पिटल' या मालिकांमध्ये काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur : सोलापूरमध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची दैना;खरीप पिके जलमय | VIDEO

कृष्णा आंदेकरचा जवळचा शूटर पोलिसांच्या तावडीत; कोमकरच्या हत्येसाठी पुरवली होती पिस्तुल

Mithila Palkar: अभिनेत्री मिथिला पालकरचं समुद्रकिनारी बोल्ड फोटोशूट

Maratha Reservation :...तर लक्ष्मण हाकेंना रस्त्यावर ठोकू, आमच्या लेकीबाळीची इज्जत काढतोय; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

एकच नंबर! फक्त ६१ रूपयात १००० चॅनेल, सरकारी कंपनीची भन्नाट ऑफर, वाचा अॅक्टिव्हेशनची प्रोसेस

SCROLL FOR NEXT