Varun Dhawan Dance Video Saam TV
मनोरंजन बातम्या

Varun Dhawan Viral Video: अनन्या बिर्लाच्या 'Caught Up' वर थिरकला वरुण धवन; कारमधील व्हिडिओ व्हायरल

Varun Dhawan Instagram Story: वरुण धवन त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला.

Pooja Dange

Varun Dhawan Dance Movies On Ananya Birla's Caught Up: बॉलिवूड अभिनेता वरुण धवन नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतो. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करून तो त्याच्या फॅन्सशी कनेक्टडेड असतो. असा कूल अभिनेता नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकतो. वरुणने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो मेकअप करताना दिसत आहे.

वरुण धवन त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये वरुण धवन अनन्या बिर्लाचे इंग्रजी गाणे Caught Up मेकअप करताना दिसत आहे. (Latest Entertainment News)

वरुण धवनने त्याच्या त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्टसह कॅप्शन देखील लिहिले आहे. वरुणने लिहिले आहे की, 'डुलकी घेताना पकडला गेला होता त्यामुळे मला कारमध्येच तयार व्हावे लागले.' मेकअप करत असताना वरुण अनन्याच्या गाण्यावर डुलताना दिसत आहे.

वरुण धवन या व्हिडिओमध्ये त्याच्या आलिशान कारमध्ये आहे. त्याच्यासोबत त्याचे मेकअप आर्टिस्ट आहेत. वरुण धवन ग्रे टी-शर्ट आणि ब्ल्यु बॉक्सर घातली आहे.

Caught Up अनन्यासाठी खूप खास आहे कारण 2 वर्षांनंतर तिचे इंग्रजी सिंगल गाणे प्रदर्शित झाले आहे. यावर्षीच्या मे महिन्यात हे गाणे प्रदर्शित झाले.

कॅट अप हे गाणे ग्रॅमी पुरस्कार विजेते किम्बर्ली क्रिसियुक उर्फ ​​किडेन्स (बियोन्से, एरियाना ग्रांडे) आणि ट्रेव्हर मॅझी (लेडी गागा, जेसन डेरुलो) यांनी लिहिलेले आहे आणि एम.ए.आर.एस. यांनी प्रॉड्यूस केले आहे. आता वरुणही या गाण्यावर थिरकताना दिसला.

वरुण धवन सामंथा रूथ प्रभूसोबत सिटाडेलच्या भारतीय व्हर्जनमध्ये दिसणार आहे. सर्बियामध्ये याचे शूटिंग सुरू आहे. तर जान्हवी कपूरसोबतचा त्याचा बवाल हा चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Investment: आता NSE वर शेअर्सप्रमाणे खरेदी करू शकाल सोने; काय आहे EGR? जाणून घ्या फायदे-तोटे

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसणार, शिवसेनेतील बडा नेता नाराज? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Accident: पालघरमध्ये वऱ्हाडाच्या ट्रकला कंटेनरची धडक, १२ जणांचा मृत्यू; मुंबई- अहमदाबाद महामार्गावर रक्ताचा सडा

Maharashtra News Live Update: अकोल्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Makeup Box Full Kit: परफेक्ट मेकअप लूकसाठी बॉक्समध्ये असायला पाहिजेत 'हे' ब्यूटी प्रॉडक्ट

SCROLL FOR NEXT