Varun Dhawan Saam TV
मनोरंजन बातम्या

Varun Dhawan : वरुण धवनच्या चिमुकलीला पाहिलंत का? फादर्स डे निमित्त पहिल्यांदाच फोटो केला पोस्ट

Varun Dhawan Father's Day Celebration : वरुणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये त्याच्या मुलीचा चेहरा अगदी थोडासा दिसतो आहे. तर या चिमुकलीने तिच्या हाताने बाबांचं बोट पकडलं आहे.

Ruchika Jadhav

आज फादर्स डे आहे त्यामुळे सोशल मीडियावर अनेकजण आपल्या मुलांसह आणि आनेक मुलं आपल्या वडिलांसोबतचे फोटो शेअर करत आहेत. अशात काही कलाकारांनीही आपल्या मुलांसोबतचे सुंदर फोटो पोस्ट केलेत. त्यात वरुण धवनने देखील त्याच्या चिमुकल्या लेकीसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत.

बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने नताशा दलालसोबत साल २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यानंतर ३ जून २०२४ मध्ये या दोघांनीही आपल्या पहिल्या बाळाला जन्म दिला. वरुणला क्युट कन्यारत्न प्राप्त झालं आहे. तो त्याच्या मुलीवर जिवापाड प्रेम करतो. त्यामुळे आजही त्याने आपण बाबा झाल्याचं सांगत सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे.

वरुणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये त्याच्या मुलीचा चेहरा अगदी थोडासा दिसतो आहे. तर या चिमुकलीने तिच्या हाताने बाबांचं बोट पकडलं आहे. वरुणच्या मुलीला पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून चिमुकलीची एक झलक पाहण्यासाठी चाहते तरसत होते.

अशात वरुणने मुलीसोबतचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. माझ्या वडिलांनी मला शिकवले की हा दिवस साजरा करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुमच्या कुटुंबासाठी काम करणे होय. त्यामुळे मी देखील तेच करत आहे. मुलीचा बाप झाल्यावर जो आनंद होतो तो कोणत्याही अन्य आनंदापेक्षा जास्त मोठा आहे."

वरुणने ही पोस्ट शेअर करून अवघा एक तास झाला आहे. मात्र तोपर्यंतच या व्हिडिओला लाखोंच्या घरात लाइक्स आणि शेअर्स तसेच हार्ट इमोजी मिळाले आहेत. चिमुकलीचा कोमल छोटा हात म्हणजेच संपूर्ण जग असं देखील काहींनी कमेंटमध्ये म्हटलं आहे. तर काहींनी वरुणची मुलगी सर्वात भाग्यवान आहे, असंही म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महापालिका निवडणुका एकत्र लढवणार का? एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात विषय संपवला

Pilot Working Time: पायलट आठवड्यातून किती तास काम करतात?

New Year Celebration : न्यू ईअर सेलिब्रेट करायचा आहे? मग भारतातील या ठिकाणी नक्कीच जा

kobi Aloo Matar Bhaji: नुसती कोबीची भाजी खाऊन कंटाळता? हे पदार्थ मिक्स करून होईल चमचमीत भाजी

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत १६५ कोटींचा घोटाळा; १२ हजार पुरुष लाभार्थी; पैसे वसूल करणार

SCROLL FOR NEXT