Famous Actress saam tv
मनोरंजन बातम्या

Israel Iran War : इस्रायल-इराण युद्धादरम्यान दुबई विमानतळावर अडकली बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, पंतप्रधान मोदींकडे मागितली मदत

Famous Actress : इस्रायल इराण युद्धादरम्यान बॉलिवूड अभिनेत्री दुबई विमानतळावर अडकली आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट करून पंतप्रधान मोदींकडे मदत मागितली आहे.

Shreya Maskar

इस्रायल इराण युद्धामुळे दुबई विमानतळावरील सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली.

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दुबई विमानतळावर अडकली आहे.

अभिनेत्रीने भारत सरकारकडे मदत मागितली आहे.

अमेरिका आणि इस्रायलने इराणवर (Israel Iran War ) केलेल्या हल्ल्यांनंतर परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे. याचा थेट परिणाम सर्वसामान्य जनतेवर झालेला पाहायला मिळत आहे. अशातच बॉलिवूडची एक प्रसिद्ध अभिनेत्री दुबई विमानतळावर अडकलेली आहे. तिने सोशल मिडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करून पंतप्रधान मोदींना मदतीचे आवाहन केले आहे.

दुबई विमानतळावर अडकलेली बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून सोनल चौहान (Sonal Chauhan) आहे. ती एक उत्तम गायिका देखील आहे. इस्रायल इराण युद्धादरम्यान दुबईमध्येही हल्ले केले जात आहेत, ज्यामुळे दुबई विमानतळावरून सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

अभिनेत्रीने पंतप्रधानांना केले आवाहन

"माननीय पंतप्रधान मोदीजी,

सध्याच्या संकटामुळे मी दुबईमध्ये अडकली आहे. विमाने रद्द झाली आहेत आणि भारतात परतण्याचा कोणताही मार्ग नाही. घरी परतण्यासाठी सुरक्षित प्रवासासाठी मी सरकारकडून मदत मागते. कोणत्याही मदतीबद्दल मी आभारी आहे."

सोनल चौहान कोण?

सोनल चौहान ही एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री, मॉडेल आणि गायिका आहे. जिने तिच्या पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांमध्ये एक खास ओळख निर्माण केली. सोनल चौहानला 2008 च्या 'जन्नत' चित्रपटाने प्रचंड प्रसिद्धी मिळाली, ज्यामध्ये तिने इमरान हाश्मीसोबत झळकली. आजही तिला 'जन्नत गर्ल' म्हणून ओळखले जाते.

सोनल चौहानने 'अदा' चित्रपटात गाणे गायले आहे.सोनल ही केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर दक्षिण भारतीय चित्रपटांमध्येही लोकप्रिय चेहरा आहे. काही काळापूर्वी, सोनल प्रभास अभिनीत मेगा-बजेट चित्रपट 'आदिपुरुष' आणि नागार्जुनचा 'द घोस्ट' चित्रपटात दिसली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मी अवतारी, तू मागील जन्माची अप्सरा'; लग्नाचं आमिष दाखवत महिलेचं लैंगिक शोषण; अशोक खरातविरुद्ध तिसरा गुन्हा दाखल

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातल्या ज्योतिबा मंदिरातील 15 ते 20 पुजाऱ्यांकडून दोन भाविकांना लाथा बुक्क्यांनी मारहाण

लांडगा-कुत्र्याचं मिलन धोकादायक, संकरातून हिंस्त्र पिल्लांचा जन्म, महिलेवरच्या हल्ल्यानंतर वनविभागाला जाग?

महाराष्ट्रातील भाजपचा अनुभवी चेहरा हरपला! देशाच्या राजकारणात हळहळ

Maharashtra Kesari : हर्षवर्धन सदगीर डबल महाराष्ट्र केसरी, फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान

SCROLL FOR NEXT