Manasvi Choudhary
आकाशात उडणारी विमाने तुम्ही देखील पाहिलेच असतील, विमाने ही शक्यतो पांढऱ्या रंगाचीच असतात.
आकाशात उडणाऱ्या विमानाचा रंग हा प्रामुख्याने पांढरा असतो.
विमानाचा रंग पांढरा असण्यामागचे नेमकं कारण काय आहे? हे या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.
पांढरा रंग हा सूर्यप्रकाश परावर्तित करतो यमुळे विमानाची बॉडी जास्त गरम होत नाही जेव्हा विमान रनवेवर उभे असते तेव्हा पांढरा रंग तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
विमानाच्या सुरक्षिततेसाठी अनेकदा तपासणी केली जाते यावेळी विमानवर कोणत्या जागी तडा गेला नाही ना? इंधन गळत नाही ना? गंज किंवा इतर तांत्रिक बिघाड झाले नाही ना ही तपासणी केली जाते.
विमानाला रंग देणे ही महागडी प्रक्रिया आहे. कोणत्याही इतर रंगापेक्षा पांढरा रंग देणे सोपे ठरते.
विमाने हवेत खूप उंचीवर उडतात, गडद रंग सूर्यप्रकाशामुळे लवकर फिके पडतात पांढरा रंग उंच आकाशात दिसते.
निळ्या आकाशात किंवा रात्रीच्या वेळी पांढऱ्या रंगाचे विमान इतर विमानांना किंवा रडारला सहज दिसते.
पक्षी पांढऱ्या रंगाला इतर रंगांच्या तुलनेत लांबून ओळखू शकतात आणि विमानाला धडकण्यापूर्वी बाजूला होऊ शकतात.