Urvashi Rautela With Chiranjeevi Instagram/@urvashirautela
मनोरंजन बातम्या

Urvashi Rautela: उर्वशी रौतेलाने 'आरपी'चा खरा अर्थ सांगितला, ऋषभ पंतसोबतच्या नात्याच्या केला खुलासा

ऋषभ पंत यांच्या डेटिंगच्या अफवांमुळे सोशल मीडियावर बराच गदारोळ झाला होता.

Pooja Dange

Urvashi Rautela News: बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला गेल्या काही महिन्यांपासून सतत ट्रोल होत आहे. या अभिनेत्रीचे नाव क्रिकेटपटू ऋषभ पंतसोबत जोडले जात होते. उर्वशी आणि ऋषभ पंत यांच्या डेटिंगच्या अफवांमुळे सोशल मीडियावर बराच गदारोळ झाला होता. मात्र, आता अभिनेत्रीने या प्रकरणावर आपले मौन तोडले आहे. उर्वशीने खरा आरपीविषयी सुद्धा सांगितले आहे.

उर्वशी रौतेलाने आता या सर्व अफवांवर आपले मत मांडले आहे. माध्यमांशी बोलताना उर्वशी म्हणाली, "आरपी माझा को-स्टार आहे ज्याचे खरे नाव राम पोथिनेनी आहे. मला हे देखील माहित नव्हते की ऋषभ पंतला आरपी म्हणून ओळखले जाते. लोक स्वतःचा काहीही विचार करतात आणि त्याबद्दल लिहितात. जे अशा अफवांवर विश्वास ठेवतात त्यांना मी म्हणेन की त्यांनी चौकशी केली पाहिजे. तुम्ही काहीच पाहिलेलं नसतं? मग फक्त कोणीतरी youtuber किंवा कोणीतरी काहीतरी बोलत आहे म्हणून, तुमचा त्यावर विश्वास कसा ठेवता?

ऋषभ पंतसोबत तिचे नाव जोडण्यात आल्यानंतर सोशल मीडियावर वाद सुरू झाले होते. उर्वशी रौतेला न घाबरता यावर व्यक्त झाली आहे. अभिनेत्री म्हणाली, "नेहमीच क्रिकेटपटू आणि अभिनेत्यांची तुलना होत असते. साहजिकच क्रिकेटर्सना कोणत्याही अभिनेत्यापेक्षा जास्त मान मिळतो, ते अभिनेत्यांपेक्षा जास्त कमावतात... आणि याचा मला खूप त्रास होतो. मला मान्य हे की ते देशासाठी खेळतात आणि त्यांना खूप प्रेम आणि आदर मिळतो, पण कलाकारही खूप काही करतात. जर त्यांनी देशाचे प्रतिनिधित्व केले असेल तर मी स्वतः ते अनेकदा केले आहे, परंतु मला ही मुर्खासारखी केलेली तुलना आवडत नाही. ” (Urvashi Rautela)

उर्वशी रौतेला लवकरच साऊथ सुपरस्टार चिरंजीवीसोबत 'वाल्टेयर वीरय्या' या चित्रपटात दिसणार आहे. उर्वशीचेही या चित्रपटात एक खास गाणे आहे. (Movie)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sambhajinagar : घरात घुसून माय-लेकींना मारहाण; संभाजीनगरात किरकोळ वाद विकोपाला

KIA ची अलिशान कार 4.48 लाखांनी होणार स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत

Maharashtra Politics: भाई उलट्या मार्गाने गेले असते तर तटकरे जन्माला आले नसते; शिंदेंच्या आमदारानी तटकरेंना डिवचल|VIDEO

Maharashtra Live News Update : उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक; मतदान प्रक्रियेला सुरुवात

होम लोन, कार लोन झालं स्वस्त; नवरात्रीआधी 'या' बँकेने घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT