Urfi Javed In Dubai, Urfi Javed News Saam Tv
मनोरंजन बातम्या

Urfi Javed Detained: उर्फी जावेदचा नवीन प्रताप, दुबई पोलिसांनी घेतले ताब्यात; नक्की काय केला कारनामा?

उर्फी जावेद तिच्या आगामी प्रोजेक्टच्या शूटिंगसाठी दुबईला गेली आहे.

Pooja Dange

Urfi Javed Detained In Dubai: उर्फी जावेद तिच्या बोल्डनेसमुळे आणि अतरंगी फॅशनमुळे ओळखली जाते. उर्फीला खरी ओळख मिळाली ती 'बिग बॉस ओटीटी या शोमुळे. उर्फी सध्या दुबईमध्ये आहे. दुबईमध्ये गेल्यापासून उर्फी अनेक समस्यांना बळी पडत आहे. उर्फीला आता दुबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उत्तेजक कपडे घालून फिरणे दुबईमध्ये बेकायदेशीर आहे. परंतु उर्फीने नेमकं तसंच काहीसं केलं आहे. (Urfi Javed News)

उर्फी नुकतीच तिच्या आगामी प्रोजेक्टच्या शूटिंगसाठी दुबईला गेली आहे. एक आठवडा उलटून गेला तरी उर्फी अजून भारतात परतलेली नाही. उर्फी तिच्या दुबई ट्रिपमधील फोटो आणि व्हिडिओ तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. उर्फी दुबईमध्ये जाऊन हॉस्पिटलमध्ये अॅडमिट सुद्धा झाली होती. (Video)

माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार उर्फी रिव्हिलिंग ड्रेस घालून एक व्हिडिओ शूट करत होती. उर्फीचे हे शूटिंग ओपन एरियामध्ये सुरू होते. दुबईमध्ये अशा मोकळ्या जागी एक्सपोजिंग कपड्यांमध्ये शूटिंग करण्याची परवानगी नाही. त्यामुळे पोलिसांनी उर्फीला ताब्यात घेतले आहे. तसेच तिची चौकशी सुद्धा सुरू केली आहे.

उर्फीच्या आउटफिटमध्ये 'काही प्रॉब्लेम' नव्हता, असे एका अहवालात म्हटले आहे. मात्र उर्फीने हा व्हिडिओ मोकळ्या जागेत शूट केला होता, त्यामुळे दुबईतील अधिकाऱ्यांकडून तिची चौकशी करण्यात येत आहे. अहवालात असेही म्हटले आहे की UAE मधील स्थानिक अधिकारी उर्फीला भारतात जाण्याची परवानगी इतक्यात देणार नाहीत. (Dubai)

उर्फी जावेदला तिची दुबई ट्रिप फारच महागात पडली आहे. आजारपण आणि पोलिसांची चौकशी उर्फीच्या मागे लागली आहे. उर्फी ता या सगळ्यातून कधी बाहेर पडणार याचा अंदाज लावता येत नाहीये. परंतु उर्फीच्या या बातमीने तिचे चाहते चिंतेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kiwi: किवी खाण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे माहितीये का?

Pandharpur to london wari : पंढरीची वारी लंडनच्या दारी; 70 दिवसांत विठुरायाची वारी पोहोचली लंडनला, फोटो पाहून उर भरून येईल

Classy Co-ord Set: ऑफिस किंवा कॉलेजसाठी ट्राय करा 'हे' क्लॉसी को-ऑर्ड सेट्स

Maharashtra Live News Update : पालघर जिल्ह्याला सोमवारी रेड अलर्ट, प्रशासनाकडून सुट्टी जाहीर

Akash Deep : वडिलांचं छत्र हरपलं, ६ महिन्यांत भावाचाही आधार गेला! कसोटीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आकाश दीपचा संघर्षमय प्रवास

SCROLL FOR NEXT