Urfi Javed on Her Father Saam TV
मनोरंजन बातम्या

Urfi Javed on Her Father : उर्फीने वडिलांबाबत केला धक्कादायक खुलासा; भूतकाळ वाचून तुमचाही उडेल थरकाप

उर्फीचे वडील तिच्याशी कसे वागायचे याची सर्व माहिती तिने आज एका मुलाखतीमध्ये दिली आहे.

Ruchika Jadhav

Urfi Javed Past : उर्फी जावेद नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय असते. तिच्या बिंधास्त आणि बेधडक स्वभावाने तिने आजवर अनेक संकटे स्वत:वर ओढावून घेतली आहेत. सध्या उर्फी तिच्या एका पास्टमुळे चर्चेत आली आहे. उर्फीला तिच्या वडिलांनी फार त्रास दिल्याची चर्चा सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून होत होती. त्यामुळे आता तिने स्वत: या विषयी माहिती दिली आहे. (Shocking Past)

उर्फीने लहानपणी फार मोठमोठ्या आघातांचा सामना केला आहे. तिचे वडील तिच्याशी तसेच आई आणि बहिणींना चांगली वागणूक देत नव्हते. ते सातत्याने त्यांना मारहाण करायचे. उर्फीचे वडील तिच्याशी कसे वागायचे याची सर्व माहिती तिने आज एका मुलाखतीमध्ये दिली आहे.

'ह्यूमन्स ऑफ बॉम्बे' ला दिलेल्या मुलाखतीमध्ये उर्फीने ही माहिती दिली आहे. यामध्ये तिने म्हटलं आहे की, आमचं कुटुंब लखनऊमध्ये राहत होतं. ज्यावेळी मी लहान कपडे घालायचे तेव्हा सर्व मुलं माझ्याकडे वाईट नजरेने पाहत होते. या गोष्टीची मला चिढ यायची. अशात माझ्या वडीलांनी देखील माझा तिटकार केला. माझ्या कपड्यांवरून ते सतत मला वाईट शब्दांमध्ये बोलायचे. एकदा त्यांनी मला यावरून खूप मारले होते. मी अगदी बेशुद्ध होईपर्यंत त्यांनी मला मारहाण केली, असं उर्फीने मुलाखतीमध्ये म्हटलं आहे.

उर्फीने मुलाखतीमध्ये पुढे असंही सांगितलं की, एकदा तिच्या आयुष्यात अशीही वेळ आली की, तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. उर्फी तिच्या वडीलांमुळे आणि समाजात तिच्यावर होणाऱ्या टीकेमुळे डिप्रेशनमध्ये गेली होती. त्यामुळे तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. पुढे तिने आपल्या आयुष्यात कितीही संकटं आली तरी थांबायचं नाही असं ठरवून उर्फीने पुढे जायचे ठरवले.

उर्फीच्या वडिलांनी (Father) ती १७ वर्षाची होती तेव्हा तिला बेदम मारहाण केली होती. त्यांनी उर्फीच्या आईला देखील मारहाण करत सोडून दिले होते. त्यामुळे उर्फीने लखनऊमधील घर सोडून दिले आणि ती दिल्लीमध्ये आली. इथे आल्यावर तिने क्लासेस घ्यायला सुरूवात केली. तसेच ती कॉल सेंटरमध्ये काम करू लागली. त्यानंतर उर्फीने मुंबई गाठली. इथे आल्यावर तिने काही ठिकाणी इंटरव्हू दिला तसेच नंतर ती बीग बॉस ओटीटीमध्ये गेली. मात्र इथे देखील तिला फार यश मिळाले नाही. त्यामुळे तिने आपल्या कपड्यांच्या फॅशनमधून प्रसिद्धी मिळवण्याचा निर्णय घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Political News : लेकीसाठी वडिलांचा राजकीय त्याग! भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंतांचा राजीनामा

Pune–Sambhajinagar Expressway : पुणे-संभाजीनगर फक्त ३ तासांत, 10 लेनचा एक्सप्रेसवे होणार, पहिल्या टप्प्याचे काम झाले सुरू

Pune Land Scam : पुणे जमीन घोटाळा, पार्थ पवारांचे नाव वगळले?

Maharashtra Live News Update: खगोलशास्त्रातील आणखी एक तारा हरपला

Manoj Jarange : हत्येची सुपारी देणारा नेता कोण? जरांगे पाटील करणार मोठा गौप्यस्फोट

SCROLL FOR NEXT