Anurag Thakur On Bollywood Saam TV
मनोरंजन बातम्या

Anurag Thakur On Bollywood: PM मोदींनंतर आता केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले 'आधी चित्रपटाबद्दल जाणून घ्या मगच...'

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी घेतली बॉलिवूड चित्रपटांची बाजू.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Anurag Thakur Spoke About Boycott Bollywood Trend: बॉलिवूड इंडस्ट्री आणि चित्रपटांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून बहिष्कार टाकून बॉयकॉट बॉलिवूड हा ट्रेंड गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. या बॉयकॉट ट्रेंडचा परिणाम मोठ्या स्टार्सच्या चित्रपटांवर देखील झाला. ज्यामुळे काही मोठ्या चित्रपटांना बिग फ्लॉपचाही सामना करावा लागला.

2 दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या शाहरुख खानच्या 'पठान' या चित्रपटाने बहिष्काराचा हा ट्रेंड मोडून काढला आह. 'पठान' चित्रपटाने दोन दिवसांत 100 कोटींचा आकडा पार केला आहे. सगळीकडे फक्त 'पठान' चित्रपटाची चर्चा आहे.

'पठान' कौतुक सर्व स्थरातून गेले जात आहे. आता केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी देखील या चित्रपटावर भाष्य केले आहे. त्यांनी बॉयकॉट ट्रेंड संदर्भात आपले मत सर्वांसमोर मांडले आहे. चित्रपटांविरोधात ट्रेंड केले जाऊ नयेत, असे त्यांचे म्हणणे आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात चित्रपटाचे नुकसान होते. एएनआय या वृत्तसंस्थेने अनुराग ठाकूर यांचे वक्तव्य ट्विट शेअर केले आहे.

त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, आमचे चित्रपट आज जगात स्वत:चे नाव कमावत आहेत. मग या (बॉयकॉट) प्रकरणाच्या चर्चेचा वातावरणावर परिणाम होतो. वातावरण बिघडवण्यासाठी कधी कधी पूर्ण माहिती नसतानाही लोक कमेंट करतात, त्यामुळे चित्रपटाचे नुकसानही होते, असे होऊ नये: केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर.

याशिवाय अनुराग ठाकूर म्हणले की, भारत सरकारने सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन बनवले आहे. त्यामुळे कोणताही चित्रपट चित्रपटगृहात गेला तर तो तिथूनच जाईल. ते सर्व पैलूंवर लक्ष ठेवतात. तिथून परवानगी मिळाल्यावर चित्रपट थिएटरमध्ये येतात.

हे वक्तव्य समोर आल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, 'पठान' चित्रपटाने सगळ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. आमिर खान आणि अक्षय कुमारचे चित्रपट या बॉयकॉट ट्रेंडच्या विळख्यात आले. त्यामुळे लाल सिंह चड्ढा आणि रक्षाबंधन बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. 'पठान' चित्रपटालाही कडाडून विरोध करण्यात आला होता. 'पठान' चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटाला बॉयकॉट ट्रेंड सुरू झाला होता. या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणीही करण्यात आली होती.

ठिकठिकाणी 'पठान' चित्रपटातील कलाकारांचे पुतळेही जाळण्यात आले होते. अनेक भाजप नेत्यांनी आणि हिंदू संघटनांनी देखील या चित्रपटाला विरोध केला होता. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शितही होऊ शकणार नाही, असे मानले जात होते.

मात्र 4 वर्षांनंतर शाहरुख खानच्या धमाकेदार कमबॅकने सर्वांचीच बोलती बंद झाली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. 'पठान'ने आतापर्यंत अनेक विक्रम मोडीत काढले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Maharashtra Election 2024 : कांदा महागला, महायुतीला फायदा होणार? जाणून घ्या बांग्लादेश अन् इराणसोबत कनेक्शन

Winter Season: थंड हवामानात चांगल्या आरोग्यासाठी 'हे' पदार्थ ठरतात फायदेशीर

Government Job: १०वी, १२ वी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी! भारत डायनामिक्स लिमिटेडमध्ये १५० पदांसाठी भरती, अर्ज कसा करावा?

Suraj Chavan: 'मला वेड लावलयं...'म्हणतं रितेश भाऊंच्या गाण्यावर गुलीगत सूरजनं धरला ठेका, Video पाहा

SCROLL FOR NEXT