Horror Films SAAM TV
मनोरंजन बातम्या

OTT वर हॉरर धमाका! वीकेंडला 'हे' चित्रपट बघाल तर स्वत:च्या सावलीलाही घाबराल, जाणून घ्या...

Underrated Horror Films : वीकेंड मित्रमंडळींसोबत भन्नाट एन्जॉय करा. घरबसल्या OTT प्लॅटफॉर्मवरील हॉरर चित्रपटांची मेजवानी लुटा.

Shreya Maskar

हॉरर चित्रपट पाहणे अनेकांना आवडते. तर काही लोक मनात भीती ठेवून चित्रपट पाहतात. या वीकेंडला तुम्ही देखील तुमच्या कुटुंबासोबत, मित्रमंडळीसोबत हॉरर चित्रपटांची मेजवानी लुटा. वीकेंडला ओटीटी प्लॅटफॉर्मवर हे तीन हॉरर चित्रपट आवर्जून पाहा. हे भारतातील कमी रेट (Underrated Horror Films) केलेले पण चांगल्या दर्जाचे हॉरर चित्रपट आहेत. या चित्रपटांचा क्लायमॅक्स दमदार आहे. जे पाहून अंगावर नक्कीच गूजबंप येतील. अमेझॉन प्राइम वीडियो, डिज्नी प्लस हॉटस्टार,झी5 या ओटीटी प्लेटफॉर्मवर तुम्हाला हे हॉरर चित्रपट पाहता येणार आहेत.

13 बी

13 बी (13B) हा हॉरर चित्रपट 2009 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या अभिनेता चित्रपटात आर माधवन मुख्य भूमिकेत पाहायला मिळाला. या चित्रपटाची कथा तुम्हाला खूप घाबरवेल. या चित्रपटाच्या कथा आठ सदस्यांच्या भोवती फिरते. हे कुटुंब नवीन फ्लॅटमध्ये शिफ्ट होते. त्या फ्लॅटमध्ये त्यांच्यासोबत विचित्र गोष्टी घडू लागतात. ज्यामुळे त्यांचा थरकार उडतो. अचानक टीव्हीवर एक मालिका सुरू होते त्यात दाखवलेल्या घटना त्या कुटुंबासोबत घडतात. हा चित्रपट हॉटस्टार किंवा प्राइम वीडियोवर तुम्ही पाहू शकता.

पिझ्झा

पिझ्झा (Pizza ) हा चित्रपट 2012 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात मुख्य भूमिकेत विजय सेतुपती पाहायला मिळाला. हा चित्रपट कमी बजेटमध्ये तयार केला असून मात्र बॉक्स ऑफिसवर त्यांनी भरपूर कमाई केली. हा चित्रपट डिज्नी प्लस हॉटस्टारवर तुम्ही पाहू शकता.

नो स्मोकिंग

अनुराग कश्यपचा 'नो स्मोकिंग' (No Smoking) चित्रपट पाहून तुम्ही रात्रीची झोप देखील विसराल. या चित्रपटात जॉन अब्राहम, परेश रावल आणि आयशा टाकिया यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तुम्ही हा हा चित्रपट तुम्ही Zee5 वर पाहू शकता. या चित्रपटाची कथा चेन स्मोकरवर आधारित आहे. तो धूम्रपान सोडण्यासाठी पुनर्वसन केंद्रात जातो आणि तिथे अडकतो. हा चित्रपट पाहताना नक्कीच तुमच्या अंगावर काटा येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT