अभिनेता एजाज खानच्या अडचणी वाढल्या आहेत. त्याचा 'हाऊस अरेस्ट' (House Arrest Controversy) हा शो आता चांगलाच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या शोवर बंदी घालण्याची मागणी होत आहे. याच प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. आंबोली पोलीस स्टेशनमध्ये 'हाऊस अरेस्ट' आणि एजाज खान (Ajaz Khan) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'हाऊस अरेस्ट' या शोमधून अश्लीलता पसरवली जात असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
आता बजरंग दलाकडून या प्रकरणात 'हाऊस अरेस्ट' शो विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच उल्लू अँपचा एमडी अग्रवाल आणि एजाज खान विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे एजाज खान याच्या अडचणीत वाढ झाली आहे. पोलीस या प्रकरणी पुढे काय कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
'हाऊस अरेस्ट' हा शो उल्लू या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत असे. या प्रकारामुळे सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. 'हाऊस अरेस्ट' या शोचे काही अश्लील व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. ज्यात महिला स्पर्धक त्यांचे कपडे काढताना दिसत होत्या तर स्पर्धक विचित्र पोझ देताना व्हिडीओत दिसत होते. त्यामुळे 'हाऊस अरेस्ट' शोचे एपिसोड डिलीट करण्यात आले आहे. शिवसेना ठाकरे गट नेत्या प्रियंका चतुर्वेदी आणि भाजप नेत्या चित्र वाघ यांनी देखील 'हाऊस अरेस्ट' शोवर टीका केली आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) उल्लू ॲपचे सीईओ विभू अग्रवाल आणि होस्ट एजाज खान यांना समन्स पाठवले आहेत. या दोघांनीही 9 मे पर्यंत आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आता या प्रकरणात पुढे कोणती कारवाई होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.