Anant Amabai Radhika Merchant Sangeet Ceremony Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tejas Thackeray Dance : अनंत- राधिकाच्या संगीत कार्यक्रमात तेजस ठाकरे थिरकले; ‘बन्नो की सहेली...’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स, पाहा VIDEO

Anant Amabai Radhika Merchant Sangeet Ceremony : अनंत- राधिकाच्या संगीत सोहळ्यातील तेजस ठाकरेंच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बॉलिवूडच्या स्टारकिड्ससोबत तेजस ठाकरे नाचताना पाहायला मिळत आहे.

Chetan Bodke

देशातील सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या धाकट्या मुलाच्या लग्नाची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. अनंत- राधिका यांचं लग्न भारतात होणार असून लग्नाची चर्चा जगभरात होत आहे. हे कपल १२ जुलैला लग्नबंधनात अडकणार असून नुकतीच लग्नाच्या आधीच्या विधींना सुरूवात झालेली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी राधिका- अनंत यांचा संगीत समारंभ पार पडला. या संगीत सोहळ्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटींसह क्रिकेटर्स, बिझनेसमन आणि राज्यातील काही महत्वाचे राजकीय नेते या सोहळ्याला उपस्थित होते. संगीत सोहळ्यातील तेजस ठाकरेंच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बॉलिवूडच्या स्टारकिड्ससोबत तेजस ठाकरे नाचताना पाहायला मिळत आहे.

५ जुलै रोजी मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये हा इव्हेंट पार पडला. या इव्हेंटमध्ये, हॉलिवूड रॅपर जस्टीन बीबर आणि बादशाहने आपल्या खास स्टाईने सर्वांना थिरकायला भाग पाडलं. संगीत सोहळ्यातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील एका व्हिडीओत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे सुपुत्र तेजस ठाकरे बॉलिवूडच्या स्टार किड्ससोबत नाचताना दिसत आहेत. या व्हिडिओने अनेकांचे लक्ष वेधून घेतलं आहे. सध्या हा डान्स्चा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये, तेजस ठाकरे यांनी ‘बन्नो की सहेली...’ गाण्यावर डान्स केलेला आहे. त्यांच्यासोबत डान्समध्ये, सारा अली खान, अनन्या पांडे, ऑरी, मानुषी छिल्लर, शिखर पहाडिया आणि वीर पहाडिया हे सेलिब्रिटीही डान्स करताना दिसत आहेत. या ग्रुप डान्समध्ये, पहिल्या रांगेमध्ये सारा अली खान, अनन्या पांडे आणि ऑरी होता. तर तेजस ठाकरे हे तिसऱ्या रांगेमध्ये होते. त्यांच्या या डान्स व्हिडीओने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यावेळी तेजस ठाकरे यांनी कुर्ता, पायजमा आणि स्टोल वेअर केलेली होती. कायमच सिंपल अंदाजात दिसणाऱ्या तेजस ठाकरे यांचा राजेशाही थाट पाहून सर्वांचेच लक्ष वेधले.

दरम्यान, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळा १२ जुलै रोजी शुभ मुहूर्तावर ठीक दुपारी ३ वाजता मुंबईमध्ये पार पडणार आहे. तर, १३ जुलैला संध्याकाळी आशीर्वाद समारंभ पार पडेल. या समारंभाला मोजके पाहुणे उपस्थित राहणार आहेत. तर, १४ जुलैला रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या रिसेप्शन सोहळ्याला फिल्म इंडस्ट्रीतील सेलिब्रिटी, क्रिकेटर्स, बिझनेसमन आणि प्रमुख राजकीय मंडळींनाही आमंत्रित करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : भंडारा जिल्हा प्रशासनाकडून शाळांना आज आणि उद्या सुट्टी; हवामान विभागाकडून रेड अलर्ट

Beed News: बीडमध्ये रस्ता पाहणीदरम्यान ट्रक खड्ड्यात कोसळला|VIDEO

Shahapur News : टॉयलेटमध्ये रक्त आढळलं, विद्यार्थिनींची विवस्त्र करून तपासणी केली; शहापूरच्या इंग्लिश मीडियम शाळेतील प्रकार

शहापूरमध्ये शाळकरी मुलींना विवस्त्र करून मारहाण; पालकांचा एकच संताप, नेमकं काय घडलं? VIDEO

Cooking Tips : जेवणात जास्त गरम मसाला गेल्यास काय करावे?

SCROLL FOR NEXT