Two Arrested for Breaking Into Salman Khan's Farmhouse in Panve Saam TV
मनोरंजन बातम्या

Salman Khan Farmhouse: सलमान खानच्या पनवेलच्या फार्महाउसमध्ये दोघे घुसले; खोटी नावं, बोगस आधारकार्ड

Salman Khan Farmhouse in Panvel : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या पनवेल येथील फार्महाऊसमध्ये दोन तरुणांनी बेकायदा घुसण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.

Saam Tv

सिद्धेश म्हात्रे, पनवेल

Salman Khan Farmhouse in Panvel :

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या पनवेल येथील फार्महाऊसमध्ये दोन तरुणांनी बेकायदा घुसण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी दोघांना पनवेल पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्याच्यावर गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बॉलिवूडचा 'दबंग' अभिनेता सलमान खान (Salman Khan) याचं पनवेलमधील वाजेगाव येथे फार्महाऊस आहे. या फार्महाऊसमध्ये बेकायदा घुसण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार घडला आहे.

फार्महाऊसच्या (Salman Khan's Farmhouse at panvel) कम्पाउंडच्या तारा तोडून दोन तरूणांनी आतमध्ये घुसण्याच्या प्रयत्न केला होता. त्यांना सुरक्षारक्षकांनी पकडले. त्यानंतर या दोघांनाही पनवेल पोलिसांच्या ताब्यात दिले. (Entertainment News)

तरुणांकडे बनावट आधारकार्ड

सलमान खान याच्या फार्महाऊसमध्ये बेकायदा घुसखोरी करणाऱ्या तरुणांकडे बनावट आधारकार्ड (Aadhar Card) सापडले आहेत. धक्कादायक म्हणजे या दोघांना सुरक्षारक्षकांनी पकडल्यानंतर त्यांनी खोटी नावंही सांगितली होती.

पनवेल पोलिसांनी (Panvel Police) या दोघांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. तसेच त्यांना अटक करण्यात आली आहे. अजेशकुमार ओमप्रकाश गिल आणि गुरुसेवकसिंग तेजासिंग सीख अशी या दोघांची नावे आहेत.

संशय आला अन्...

अभिनेता सलमान खान याच्या वाजेगाव येथील अर्पिता फार्महाऊसमध्ये ४ जानेवारी रोजी संध्याकाळी ४ वाजता ही घटना घडली. दोन तरुणांनी तारा आणि झाडांच्या कम्पाऊंडमधून आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता.

सुरक्षारक्षकांनी त्यांना पकडले. त्यावेळी या दोघांनीही खोटी नावे सांगितली. मात्र सुरक्षा रक्षकांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना बोलावून ताब्यात दिले. या प्रकरणी पनवेल पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Two men arrested for alleged of barge into Salman Khan Farmhouse at Panvel Bollywood Latest News | Saam Tv

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : अलका टॉकीज चौकात "श्रीमंत" दाखल

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

ITR Filing : टॅक्स रिफंड परताव्याचा फॉर्म अडकून पडलाय? मग 'या' गोष्टी एकदा तपासाच

Akola Accident: गणेश विसर्जन करून परताना भक्तांवर काळाचा घाला; तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT