Theft At Anupam Kher Office Saam Tv
मनोरंजन बातम्या

Theft At Anupam Kher Office : अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी करणारा अखेर सापडला, पोलिसांनी आरोपीला ४८ तासांतच शोधून काढलं

Anupam Kher News : अभिनेते अनुपम खेर यांच्या मुंबईतील कार्यालयात दोन दिवसांपूर्वी चोरी झाली होती. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून काही मुद्देमाल जप्त केला आहे.

Chetan Bodke

ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांच्या अंधेरी पश्चिमेकडील कार्यालयात दोन दिवसांपूर्वी चोरी झाली होती. या चोरीचा पर्दाफाश करण्यात आंबोली पोलिसांना यश मिळाले आहे. चोरी करून पळून गेलेल्या या दोन्ही चोरट्यांना आंबोली पोलिसांनी अवघ्या काही तासातच अटक केली असून त्यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल देखील जप्त केला आहे.

रफिक माजिद शेख आणि मोहम्मद दिलशाद अब्दुल खान अशी या दोन आरोपींची नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडून ३४ हजाराची कॅश, फिल्मची रिल आणि फिल्म निगेटिव्ह असलेली तिजोरी असा आदी मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. चोरट्यांनी अनुपम खेर यांच्या अंधेरी पश्चिममधील ऑफिसमध्ये २० जून रोजी चोरी केली होती. चोरट्यांनी खेर यांच्या कार्यालयातून लाखोंची रोख रक्कम आणि ‘मैने गांधी को नई मारा’ या फिल्मचे रिल चोरून नेले होते. अनुपम खेर यांनी याप्रकरणाची माहिती सोशल मिडिया अकाऊंटवरुन दिली होती.

अनुपम खेर यांनी एफआयआर दाखल केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी आरोपींना अटक केली आहे. अटकेनंतर त्या दोन्हीही चोरट्यांविरोधात आणखीन गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ते सराईत चोर आहेत. दोघेही मुंबईमध्ये वेगवेगळ्या परिसरामध्ये फिरून रिक्षा चोरी करतात. इतर चोरीच्या प्रकरणामध्ये चोरांनीच अनुपम खेर यांच्या प्रॉडक्शन हाऊसच्या ऑफिसमध्ये चोरी केल्याचे समोर आले. त्याच दिवशी मुंबईतल्या विलेपार्ले परिसरातही चोरी झाली होती. दरम्यान, पोलिसांनी आरोपींकडून आणखी मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IB Recruitment: इंटेलिजेंस ब्युरोमध्ये नोकरीची संधी, पगार १,४२,००० रुपये, अर्ज कुठे अन् कसा करावा?

Period Pain Relief: मासिक पाळीच्या वेळी 'या' ड्रायफ्रूटचे सेवन करा, वेदना होतील कमी

Panchang Today: वाचा आजचे पंचांग 15 जुलै 2025; तिथीनुसार केव्हा आहे शुभ योग? 2 राशींना आज होणार लाभ

Maharashtra Live News Update: बच्चू कडू यांच्यावर यवतमाळच्या महागांव पोलिसात गुन्हा दाखल

Methi Tea Benefits: पावसात आरोग्य हवेय चांगलं? मग दररोज प्या मेथी दाण्यांचा चहा

SCROLL FOR NEXT