Jay Bhanushali And Mahhi Vij Saam Tv
मनोरंजन बातम्या

Celibrity Divorce: १४ वर्षांचा सुखी संसार मोडला! टीव्ही इंडस्ट्रीतील आणखी एका कपलचा घटस्फोट; चाहत्यांना धक्का

Jay Bhanushali Mahhi Vij Divorce: टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कपलच्या घटस्फोटाचे वृत्त समोर आले आहे. जय भानुशाली आणि माही वीज हे १४ वर्षांच्या सुखी संसारानंतर वेगळे झाले आहेत. त्यांच्या निर्णयामुळे चाहत्यांना धक्का बसला.

Priya More

Summary :

  • जय भानुशाली आणि माही वीज यांचा घटस्फोट झाला

  • दोघांनी लग्नांतर १४ वर्षांनी आपले नाते संपवलं

  • जय आणि माहीला तीन मुलं आहेत

  • घटस्फोटानंतरही दोघे मुलांना एकत्र वाढवण्याचा विचार करत आहेत

बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. टीव्ही इंडस्ट्रीतील पॉवरफुल कपल जय भानुशाली आणि माही वीज यांनी घटस्फोट घेतला. २०११ मध्ये लग्नबंधनात अडकलेल्या या जोडीने १४ वर्षानंतर वेगळं होण्याचा निर्णय घेतला. काही महिन्यांपूर्वी त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया जुलै- ऑगस्ट २०२५ मध्ये पूर्ण झाली आहे.

जय भानुशाली आणि माही वीज यांनी अधिकृतरित्या आपले नाते संपवले आहे. त्यांना तीन मुलं आहेत. दोघांनी आपले नातं वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण ते वाचवू शकले नाही. परिणामी त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि घटस्फोट घेतला. जय आणि माही यांनी घटस्फोट घेतल्याचे वृत्त कळताच त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला.

असे सांगितले जात आहे की, जय भानुशाली आणि माही वीज यांच्यात बऱ्याच काळापासून सगळं काही ठीक नव्हतं. त्यांच्यामध्ये सतत मतभेद होत होते. त्यांनी काही महिन्यांपूर्वीच न्यायालयात धाव घेत घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. ते अनेक वर्षांपासून वेगळे राहत होते. त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्याही या वर्षी जुलैमध्ये समोर आल्या होत्या. दोघांनी घटस्फोटाच्या कागदपत्रांवर सही केली. त्यानंतर त्यांच्या घटस्फोटाचे वृत्त समोर आले. अहवालानुसार, जय आणि माही जुलै-ऑगस्ट महिन्याआधीच वेगेळे झाले होते. दोघांनीही त्यांचे नाते मैत्रीपूर्णपणे संपवले. दोघांनीही नातं वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले पण त्यात त्यांना यश आले नाही.

दरम्यान, ४० वर्षीय जय भानुशाली एक उत्कृष्ट अभिनेता आहे. तर ४३ वर्षीय माही वीज ही देखील उत्कृष्ट अभिनेत्री आहे. तिने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. माहीने २०११ मध्ये तिच्यापेक्षा ३ वर्षांनी लहान असलेल्या जयशी लग्न केले होते. लग्नाच्या सहा वर्षांनंतर २०१७ मध्ये त्यांनी घरामध्ये काम करणाऱ्या नोकरीनीच्या २ मुलांना दत्तक घेतलं होतं. तर २०१९ मध्ये माहीने मुलीला जन्म दिला. त्यांच्या मुलांची नावं तारा, राजवीर आणि खुशी अशी आहेत. घटस्फोटानंतरही दोघेही आपल्या मुलांना एकत्र वाढवण्याचा विचार करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asthma: अस्थमाची लक्षणे कोणती? अशी घ्या काळजी

Bihar Election : निवडणुकीआधी माजी उपमुख्यमंत्र्यांचा दणका; 27 नेत्यांची पक्षातून हकालपट्टी

रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार? चाहत्यांमध्ये खळबळ

Maharashtra Politics: कोकणात वर्चस्वासाठी राणे बंधूंमध्ये संघर्ष, थोपटले एकमेकांविरोधात दंड

Pramod Mahajan Case: प्रमोद महाजनांना का संपवलं? महाजनांच्या हत्येचा नवा अँगल समोर

SCROLL FOR NEXT