Govinda and Sunita Ahuja Divorce: मी खूप वेळा माफ केले, पण...; पत्नी सुनीतासोबतच्या डिव्होर्सच्या अफवांवर गोविंदाचा मोठा खुलासा

Govinda and Sunita Ahuja Divorce: गेल्या काही काळापासून गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्या त्यांचा घटस्फोटाच्या बातम्यासमोर येत होत्या. आता, गोविंदाने स्वतः याबद्दल उघडपणे मत व्यक्त केले आहे.
govinda sunita ahuja divorce
govinda sunita ahuja divorcesaam tv
Published On

Govinda and Sunita Ahuja Divorce: बॉलीवूडचा नंबर १ हिरो गोविंदा आजकाल चित्रपटांमध्ये फारसा दिसत नाही, पण तो सतत चर्चेत असतो. गेल्या काही काळापासून गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्यात काही ठीक नाही अशा बातम्या येत आहेत. असेही म्हटले जात होते की गोविंदाचे विवाहबाह्य संबंध होते. त्यामुळे त्यांचा घटस्फोट होणार होता. पण, गोविंदा आणि सुनीता यांनी यावर अतिशय संयमी पद्धतीने याचा विरोध केला आहे. आता, गोविंदाने स्वतः याबद्दल उघडपणे आपले मत व्यक्त करत अनेक खुलासे केले आहेत.

govinda sunita ahuja divorce
Savalyachi Janu Savali: 'सावळ्याची जणू सावली' मालिकेत मोठा ट्विस्ट; लवकरच होणार 'या' दोन कलाकारांची होणार दमदार एंट्री

अलीकडेच, गोविंदा ट्विंकल खन्ना आणि काजोल यांनी होस्ट केलेल्या 'टू मच' या टॉक शोमध्ये दिसला. या शो दरम्यान, अनेक खुलासे झाले आणि येथेच गोविंदाने त्याची पत्नी सुनीता आहुजा हिच्या घटस्फोटाच्या बातमीवर प्रतिक्रिया दिली. गोविंदाने म्हटले की कोणीही त्याला आणि त्याची पत्नी सुनीताला वेगळे करू शकत नाही. गोविंदाने स्पष्ट केले, "खरं सांगायचं तर, सुनीता एका मुलासारखी आहे, पण तिला देण्यात आलेल्या जबाबदाऱ्या तिने खूप चांगल्या प्रकारे पार पाडल्या. ती खरोखरच एक प्रामाणिक मुलगी आहे. तिचे शब्द कधीच चुकीचे नसतात. कधीकधी ती अशा गोष्टी बोलते ज्या तिने बोलू नयेत. तिने खूप चुका केल्या आहेत, पण मी तिला माफ केले आहे. मी तिला आणि संपूर्ण कुटुंबाला खूप वेळा माफ केले आहे."

govinda sunita ahuja divorce
Rakhi Sawant: राखी सावंत आणि आदिल दुर्राणीचं पॅचअप; अभिनेत्रीने केस घेतली मागे, न्यायालयाने केला FIR रद्द

गोविंदाने जोर देऊन सांगितले की त्याने त्याची पत्नी सुनीताला अनेक वेळा माफ केले आहे. गोविंदाने कबूल केले की त्याला सुनीताचे विचार समजण्यास अडचण येते. यासह गोविंदाने त्याची पत्नी सुनीताचे कौतुकही केले आणि म्हटले की त्याची मुले समजतात की त्यांच्या आईला त्यांना मुलांसारखे समजावून सांगितले पाहिजे.

घटस्फोटाच्या अफवांबद्दल सुनीतानेही असेच काहीसे म्हटले

गोविंदा आणि सुनीता आहुजा बऱ्याच काळापासून वेगळे राहत आहेत. माहितीनुसार गोविंदा त्याच्यापेक्षा अनेक वर्षांनी लहान असलेल्या महिलेशी डेटिंग करत होता. म्हणून त्याचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर, सुनीताने स्वतः गणपती पूजेदरम्यान स्पष्ट केले की ती आणि गोविंदा वेगळे होत नाहीत आणि कोणीही त्यांना वेगळे करू शकत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com