Shweta Tiwari SAAM TV
मनोरंजन बातम्या

Shweta Tiwari : 'पलक तर हिच्यापेक्षा वयाने मोठी दिसते', 43 वर्षीय श्वेता तिवारीची रेखाशी तुलना

Entertainment News : टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची बॉलिवूड स्टार रेखा सोबत तुलना करण्यात आली आहे. चाहत्याच्या कमेंटने अनेकांचे लक्ष वेधून घेतलं आहे. वाचा यावर श्वेताच उत्तर...

Shreya Maskar

टीव्ही स्टार श्वेता तिवारी ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिच्या अभिनयाने तिने अनेकांच्या मनावर राज्य केले आहे. 'कसौटी जिंदगी' या टीव्ही शो मुळे श्वेता तिवारी घराघरात पोहचली. टीव्ही शो शिवाय श्वेता बॉलिवूड आणि भोजपुरी चित्रपटांमध्येही काम करते. ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

अभिनयासोबत श्वेता सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. श्वेता तिच्या लुकचे विविध फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तसेच आपल्या वैयक्तिक आयुष्याचे अपडेट देत राहते. ती आपल्या फिटनेसमुळे नेहमी सुंदर आणि तरुण दिसते.

वयाचा ४३ वर्षी जेसे श्वेताने स्वतःला फिट ठेवले आहे. त्यामुळे ती १९-२० वर्षाच्या अभिनेत्रींना कॉम्पिटिशन देत आहे. ती जास्त वयातही तरुण मुलीसारखी दिसत आहे. लोक श्वेता तिवारीची तुलना तिच्या मुलीशी करत आहेत. पलक तिवारी तिच्या आईपेक्षा देखील मोठी दिसते असे नेटकरी म्हणाले. अशात चाहते आता श्वेताची तुलना बॉलिवूड अभिनेत्री रेखासोबत करत आहेत.

श्वेता तिवारी काय म्हणाली?

श्वेता तिवारी सध्या तिच्या 'आपका अपना झाकीर' शो च्या प्रमोशनमध्ये व्यस्त असताना दिसत आहे. अशात १० ऑगस्ट रोजी 'फिल्म ग्यान' ला मुलाखत दिली. दरम्यान, रिपोर्टरने श्वेतलाच्या एका चाहत्याच्या कमेंटबद्दल सांगितले, ज्यात लिहिलं होत की, 'ही दुसरी रेखा जी आहे, ज्यांच्यासाठी वय हा फक्त आकडा आहे.' यावर श्वेताने खूप मजेदार उत्तर दिलं की, वय खरचं फक्त नंबर असतो, जो तुमच्या चेहऱ्यावर दिसतो.

आपका अपना झाकीर शो

श्वेता तिवारी झाकीर खानच्या 'आपका अपना झाकीर' शोमध्ये दिसणार आहे. या शो च्या शूटिंग दरम्यान सेटवार स्पॉट झाली. तेव्हा श्वेता आपल्या लूकमुळे चर्चेत आली. तिने मस्टर्ड रंगाचा आउटफिट परिधान केला होता. मोकळ्या केसांमध्ये श्वेताचा लुक खुलून आला होतो. या लूकवर अभिनेत्रीचे खूप कौतुक होताना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उरण ONGC प्रकल्पाला भीषण आग

WhatsApp Down: व्हॉट्सअॅप अचानक डाऊन, सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस

IRCTC Jyotirlinga Yatra: बम बम भोले! भारतीय रेल्वेची ज्योतिर्लिंग यात्रा, कसं कराल तिकीटाचं बुकिंग, जाणून घ्या यात्रेची संपूर्ण माहिती

Shirpur : सुरुंग फुटून अंगावर पडला दगड; शिरपूर तालुक्यातील जवानाला लद्दाख येथे वीरमरण

Gardening Tips : या सोप्या टिप्स वापरून घरीच उगवा हिरवीगार पालक

SCROLL FOR NEXT