Reem Shaikh SAAM TV
मनोरंजन बातम्या

Reem Shaikh : अहमदाबाद विमान अपघातावर प्रश्न ऐकताच हसू लागली; अभिनेत्री नेटकऱ्यांकडून ट्रोल, पाहा VIDEO

Reem Shaikh Viral Video : टीव्ही अभिनेत्री रीम शेखचा सध्या एक व्हिडीओ सोशल मिडिया तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये तिला अहमदाबाद विमान अपघातावर प्रश्न विचारण्यात आला. ती नेमकं काय म्हणाली, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

सध्या अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातामुळे देशभरात चिंताजनक वातावरण पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यांपासून ते कलाकारांपर्यंत सर्वजण यावर आपली प्रतिक्रिया देत आहेत. अशात आता टीव्ही अभिनेत्री रीम शेखचा (Reem Shaikh Viral Video) एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तिने केलेल्या कृतीने ती सध्या नेटकऱ्यांकडून चांगली ट्रोल होत आहे.

रीम शेख विमान अपघातानंतर 'लाफ्टर शेफ्स 2' च्या सेटबाहेर स्पॉट झाली. तेव्हा तिने पापाराझींशी संवाद साधला. तेव्हा तिला पापाराझींनी विचारले की, "मॅडम तुम्ही काल झालेल्या घटनेबद्दल काय म्हणाल?" यावर रीम म्हणाली की, "का? काय झाले काल?" त्यानंतर ती हसू लागली. रीम शेखच्या या उत्तराने आणि तिच्या वर्तनामुळे सर्वच आश्चर्यचकित झाले आहेत. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

रीम शेखच्या अशा वागण्यामुळे तिला ट्रोल केले जात आहे. कमेंटमध्ये एका युजरने म्हटले की, "बस इंस्टाग्राम पे पोस्ट शेअर करना आता है...कुछ बोलना नही", तर दुसऱ्या युजरने लिहिलं की, "ना इसे खाना बनाना आता हे... ना कॉमेडी और ना उसके पास दिमाग हे..." तिसऱ्या युजरने लिहिलं की, "सब पता है...बस नौटंकी करत आहे... " तर चौथ्या युजरने लिहिलं की, आपण मानवता गमावत आहोत....किसी को कोई मतलब नहीं है की हमारे देश मै क्या हो रहा है..." अशा नकारात्मक कमेंट व्हिडीओवर येत आहेत.

व्हिडीओमध्ये रीम शेखला हसताना पाहून नेटकऱ्यांना खूप राग आलेला आहे. पापाराझींनी विमान अपघाताबद्दल विचारल्यावर रीमचे शांत बसने नेटकऱ्यांना चांगलेच खटकले आहे. रीम शेखने पापाराझींच्या प्रश्नावर उत्तर जरी दिले नसेल तरी तिने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करून आपले मत मांडले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Milk Cake Recipe: कमीत कमी साहित्यात बनवा हेल्दी आणि टेस्टी मिल्क केक, वाचा सोपी रेसिपी

मुंबईतील High Five सोसायटीत मोलकरणीनं आयुष्य संपवलं; घरकाम करणाऱ्या घरातच आयुष्याचा दोर कापला

Jewellery Cleaning : सोन्याच्या दागिन्यांची चमक कमी झालीय? मग २ मिनिटांत करा 'हा' उपाय

Maharashtra Live News Update: मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुन्हा एकदा खडाजंगी

Salman Khan: 'कुछ हासिल करने के लिए...'; भाईजानने केलं जबरदरस्त ट्रान्सफॉर्मेशन, 'तो' फोटो होताय व्हायरल

SCROLL FOR NEXT