Neha Bagga And Resty Kamboj Engagement Saam Tv
मनोरंजन बातम्या

Neha Bagga Engaged: 'इश्क दा कलमा'च्या 'रज्जी'ने केला साखरपुडा, बॉयफ्रेंडने रोमँटिंक अंदाजमध्ये केला प्रपोज; पाहा VIDEO

Neha Bagga And Resty Kamboj Engagement: दोघांनी देखील आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून प्रपोज केल्याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केला आहे.

Priya More

Neha Bagga Engagement:

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर नेहा बग्गाने (Neha Bagga) नुकताच साखरपुडा केला. 'इश्क दा कलमा' या प्रसिद्ध मालिकेत 'रज्जी'च्या भूमिकेतून नेहा बग्गा घरघरामध्ये पोहचली. बॉयफ्रेंड रेस्टी कंबोजसोबत नेहाने नुकताच साखरपुडा केला. रेस्टीने रोमँटिंक अंदाजमध्ये नेहाला प्रपोज केला. दोघांनी देखील आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून प्रपोज केल्याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केला आहे.

नेहा बग्गाने ही आनंदाची बातमी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे. आयुष्यातील या आनंदाच्या आणि खास प्रसंगी नेहाने लाल रंगाचा गाऊन परिधान केला होता. नेहा आणि रेस्टी गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. अखेर त्यांनी साखरपुडा केला. रेस्टीने नेहाला सरप्राईज देत फिल्मी स्टाईलमध्ये प्रपोज केला. रेस्टीने नेहाला अंगठी दिली आणि तिला लग्नासाठी प्रपोज केले.

रेस्टी कंबोजने तिला ज्यापद्धतीने प्रपोज केला ते पाहून नेहा आश्चर्यचकित झाली. तिने काही सेकंदातच हा रेस्टीचा प्रपोज स्वीकारला आणि दोघेही एकमेकांसोबत रोमँटिक झाले. रेस्टी आणि नेहाने यूट्यूबवर एक व्लॉगही शेअर केला आहे. ज्यामध्ये दोघांनी रोमँटिक क्षण टिपले आहेत.

नेहा बग्‍गाच्‍या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, नेहा बग्गाने 'इश्क दा कलमा' या मालिकेमध्ये रज्जीची भूमिका साकारली होती. २०१२ मध्ये ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेच्या माध्यमातूनच तिने टीव्ही इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला होता. यानंतर नेहा 'पिया रंगरेझ'मध्येही दिसली होती. सध्या ती युट्युबर बनली आहे. यूट्यूबवर तिचे १.४ मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT