Hina Khan  Instagram @realhinakhan
मनोरंजन बातम्या

Hina Khan: हिना खान-रॉकी जैस्वाल यांच्या नात्यातील सत्य उघड, अभिनेत्रीने केला खुलासा

हिना खानच्या पोस्टमुळे तिच्या ब्रेकअपच्या अनेक चर्चा सुरू होत्या.

Pooja Dange

Hina Khan Breakup: अभिनेत्री हिना खान नेहमीच तिच्या बोल्ड आणि हॉट लूक्समुळे चर्चेत असते. फॅन्स सुद्धा तिच्या प्रोफेशन आयुष्याइतकचं तिच्या पर्सनल जीवनाबाबत जाणून घेण्यात उत्सुक असतात. काही दिवसांपूर्वी हिनाने एक पोस्ट केली होती. ती पोस्ट पाहून अनेकांना वाटले होते की तिचा रॉकी जैस्वालसोबत ब्रेकअप झाला आहे. नुकतीच हिनाने अजून एक पोस्ट शेअर केली त्यावरून नेमकं त्यांच्या काय झालं आहे हे सर्वांसमोर आले आहे.

हिना खानने केलेल्या त्या पोस्टमुळे तिच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली होती. एका मुलाखतीदरम्यान हिनाने सांगितले की, 'माझ्या आणि रॉकीच्या नात्यात सगळं काही सुरळीत सुरू आहे. मी ब्रेकअपची पोस्ट जशी शेअर केली, माझा संपूर्ण मित्र परिवार अस्वस्थ झाला होता आणि सर्वजण मला मेसेज करत होते. सर्वजण काय झालं, हे विचारत होते. आमच्या ब्रेकअपच्या अफवा ऐकून सर्वच हैराण झाले होते. करिश्मा तन्नाने सुद्धा मला मेसेज करून विचारले की सर्व ठीक आहे ना? (Celebrity)

बॉयफ्रेंड रॉकी जैस्वाल याची यावर काय प्रतिक्रिया होती असे जेव्हा हिना खानला विचारण्यात आले तेव्हा तिने सांगितले की, "'तो एक वेगळा माणूस आहे.. त्याला या सगळ्याने काहीही फरक पडत नाही.' मला अनेक मेसेज आले आणि सगळेजण हेच विचारत होते की सर्व ठीक आहे ना? करिष्मा तन्नासह अनेक लोकांनी मला विचारलं, काय झालं? सर्व ठीक आहे ना? तेव्हा मी सांगितलं की हे एक प्रमोशनल स्टोरी आहे." (Actress)

Hina Khan Instagram Stories

हिना खानने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली होती. तिच्या पोस्टवरून तिचा विश्वासघात झाला आहे असे वाटत होते. त्यामुळे तिच्या चाहत्यांचा गैरसमज झाला होता. हिनाने तिच्या जुन्या पोस्टमध्ये लिहिले होते की, 'त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवल्यानंतर स्वतःला माफ करायला विसरू नका. कधी कधी एक चांगले हृदय वाईट गोष्टी पाहू शकत नाही. त्यानंतर तिने दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिले होते की, 'विश्वासघात हे एकमात्र सत्य आहे जे तग धरून आहे."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope: या राशींचा आज प्रेमभंग होण्याची शक्यता आहे, वाचा राशीभविष्य

Ladki Bahin Yojana : जून उजाडला, लाडक्या बहिणींना मे महिन्याचे ₹१५०० कधी मिळणार? संभाव्य तारीख आली समोर

Rain Alert : मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर, ३१ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

Maharashtra News Live Update: जालन्यात पोलिस-महसूलच्या पथकाचा वाळू माफियांना दणका, 3 हायवा, ट्रॅक्टरसह 64 लाखांचा मुद्देमाल जप्त

Shreyas Iyer : मोठी बातमी! सूर्याचं कर्णधारपद काढलं, श्रेयस अय्यर टीम इंडियाचा 'सरपंच'; युवा वैभव सूर्यवंशीलाही संधी

SCROLL FOR NEXT