Govinda Birthday: जन्मतःच वडिलांनी नाकारले, आईच्या निर्णयाने गोविंदाला मिळाले नाही पितृप्रेम

गोविंदाच्या जन्माच्या आधी त्याच्या आई-वडिलांमध्ये दुरावा आला होता.
Govinda
GovindaSaamtv

Govinda Birthday Special: बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांपैकी एक म्हणजे गोविंदा. गोविंदासाठी बॉलिवूडमध्ये येणे सोपे नव्हते. त्याच्या आई-वडील जरी या क्षेत्रात आधीपासून कार्यरत असले तरी त्यांनी बॉलिवूडमध्ये येण्यासाठी कधीच प्रोत्साहन दिले नाही.

गोविंदाच्या जन्माच्या आधी त्याच्या आई-वडिलांमध्ये दुरावा आला होता. गोविंदाच्या वडिलांनी यासाठी गोविंदाला जबाबदार ठरवले होते. त्यामुळे जेव्हा गोविंदाचा जन्म झाला तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला पाहिले देखील नव्हते.

आज (२१ डिसेंबर) गोविंदाचा ५९वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवशी जाणून घेऊया त्याच्या आयुष्याशी निगडित काही खास गोष्टी. (Birthday)

Govinda
Govinda Birthday: बापरे! अभिनेता गोविंदाला एकाचवेळी आली होती 70 चित्रपटांची ऑफर, 'या' एका जाहिरातीने बदलले नशिब

गोविंदाचा जन्म २१ डिसेंबर १९६३ साली मुंबईत झाला. त्याचे वडील अरुण यांना महबूब खानचा चित्रपट औरत (१९४०) पासून ओळख मिळाली. गोविंदाची आई निर्माण देवी सुप्रसिद्ध गायिका होती. परंतु गोविंदाच्या जन्माआधी त्या साध्वी बनल्या. गोविंदाचे आई-वडील एकत्र राहत होते. परंतु त्यांच्या दुरावा होता.

गोविंदाच्या जन्मधी त्याच्या आईने घेतलेल्या या निर्णयाचा परिणाम गोविंदावर झाला. गोविंदाच्या वडिलांना वाटले की, निर्मला देवीचे गरोदर राहिल्या त्यामुळे त्यांनी असा निर्णय घेतला. त्यामुळे जेव्हा गोविंदाचा जन्म झाला तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला जवळ सुद्धा घेतले नव्हते. काही काळानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी गोविंदाच्या वडिलांना समजावल्यानंतर त्यांचा राग आणि गैरसमज दूर झाला. (Celebrity)

Govinda With His Mother
Govinda With His MotherSaam Tv

गोविंदाचे कुटुंबीय आधी मुंबईमध्ये आलिशान बंगल्यात राहायचे. जेव्हा त्याच्या वडिलांनी चित्रपटात पैसे गुंतवले आणि त्यांना त्यातून खूप तोटा झाला तेव्हा त्यांनी तो बंगला विकला. त्यानंतर त्या संपूर्ण कुटुंबाला विरारमध्ये एका छोट्याश्या घरामध्ये राहावे लागले. विरारमधील त्याच घरी गोविंदाचा जन्म झाला. गोविंदा ६ भावंडांमध्ये सगळ्यात लहान आहेत. त्यांना लाडाने सर्वजण चीची म्हणायचे. चीचीचा इंग्रजीमध्ये अर्थ होतो लिटिल फिंगर.

गोविंदा १३-१४ वर्षाचे असतील. तेव्हापासून त्यांना चित्रपटात काम करण्याचे वेड लागले होते. परंतु गोविंदाने या क्षेत्रात जाऊ नये असे त्यांच्या आईचे ठाम मत होते. करण गोविंदाचे वडील या क्षेत्रात होते आणि त्यांना प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. गोविंदाने आईला न कळू देता फिल्म स्टुडिओमध्ये फेऱ्या मारण्यास सुरूवात केली. गोविंदाच्या आई-वडिलांनी इंडस्ट्री सोडून बरीच वर्षे झाली होती. त्यामुळे गोविंदाला स्वतःची ओळख बनविणे खूप कठीण गेले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com