Hina Khan SAAM TV
मनोरंजन बातम्या

Hina Khan: कॅन्सरशी झुंज देणारी हिना खान बॉयफ्रेंडबद्दल बोलताना झाली भावुक, म्हणाली...

Hina Khan Boyfriend : टीव्ही अभिनेत्री हिना खान सध्या ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देत आहे. आपला प्रवास सांगताना ती बॉयफ्रेंडसाठी खूप भावुक झाली. त्याच्याविषयी नेमकं काय बोली जाणून घेऊयात.

Shreya Maskar

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री हिना खान (Hina Khan) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे. गेले अनेक महिने ती ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत आहे. पण या संपूर्ण प्रवासात तिने स्वतःला खूप भक्कम ठेवले आहे. ती प्रत्येक कार्यक्रमात पाहायला मिळते. तशीच ती सोशल मीडियावर देखील चांगली सक्रिय असते. तिने अनेक लोकांना एक प्रेरणा दिली आहे.

अलिकडेच हिनाने एका मिडिया मुलाखतीत तिच्या कॅन्सर प्रवासाविषयी आणि बॉयफ्रेंड रॉकीबद्दल भरभरून बोली आहे. हिना मुलाखतीत म्हणाली की, "मी ठीक आहे. हळूहळू सावरत आहे. मी खूप स्ट्राँग आहे. त्यासाठी मी स्वत:च्या पाठीवर थाप मारली पाहिजे. माझ्या आयुष्यातील चढ-उतारांमध्ये मी अशीच असते. या कठीण काळात मी हार मानणार नाही."

हिना मुलाखतीत बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालबद्दल (Rocky Jaiswal) बोलताना खूप भावुक झाली. ती म्हणाली, "मला माझ्या आजूबाजूच्या लोकांकडून माझा जोडीदार रॉकी, माझी आई, माझा भाऊ आणि रॉकीचे कुटुंब यांच्याकडून खूप ताकत मिळते. माझ्या आजूबाजूला खूप प्रेमाची माणसे आहेत. हे प्रेम मला पुढे जाण्यास मदत करते. आज मी जिथे आहे तिथे पोहोचण्यात या प्रेमाची मला खरोखर मदत झाली आहे. विशेषत: या प्रवासात माझ्या चाहत्यांच्या शुभेच्छा माझ्यासाठी किती महत्त्वाच्या आहेत हे मी शब्दात सांगू शकत नाही."

अभिनेत्री हिना खानने आजवर अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती कोणतीही भूमिका सुरेख निभावते. तिची 'ये रिश्ता क्या कहलाता है' ही मालिका खूप गाजली आणि या मालिकेमुळे हिनाला खूप लोकप्रियता मिळाली. हिना आपल्या आयुष्यात सुरू असलेल्या कठीण काळाला मात करत लवकरच एका नव्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तिची 'गृह लक्ष्मी' मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चाहते देखील या मालिकेसाठी खूप उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Buldhana Police: बुलडाण्यात पोलिसाला सासू-सासऱ्यांकडून बेदम मारहाण, VIDEO होतोय व्हायरल

Maharashtra News Live Update: शासकीय कर्मचारी संघटनेचा संपाचा तिसरा दिवस

Kalyan: छातीत दुखू लागल्याने १०८ ला कॉल केला, पण रुग्णवाहिकेला ४० मिनिटं उशिर; तोपर्यंत रुग्णाचा मृत्यू, कल्याणमधील संतापजनक घटना

Rupali Bhosle Photos: 'अवखळ हासरी, अल्लड लाजरी; दिसते चंद्राची कोर साजरी...' रूपालीचं देखणं रूप

West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये राडा! मतदानादरम्यान दोन गट आपापसात भिडले, नेत्याच्या गाडीवर तुफान दगडफेक; पोलिसांकडून लाठीचार्च

SCROLL FOR NEXT