Hina Khan  Instagram
मनोरंजन बातम्या

Hina Khan: कॅन्सरशी झुंजणारी अभिनेत्री हिना खानवर आणखी एक संकट; मालदीवला सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेली अन्...

Hina Khan Enjoying In Maldives: हिना खान मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. नुकतंच हिनाने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केली आहे.

Manasvi Choudhary

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. हिना खानचा चाहतावर्ग मोठा आहे. हिनाने अल्पवधीतच तिच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य केले आहे. हिना खान तिच्याविषयीच्या अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असते. काही महिन्यापूर्वी हिना खानने तिला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याची माहिती दिली होती. अभिनेत्रीने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना ही माहिती दिली होती. यामुळे चाहत्यांकडून तिच्या आरोग्याची काळजी होत होती. अशातच अलिकडेच हिनाने ती आता पूर्णपणे बरी असल्याचं सांगितलं होतं. हिना नुकतंच मालदीवला सुट्टीसाठी गेली आहे. सोशल मीडियावर हिनाच्या मालदीव वेकेशनची पोस्ट लक्ष वेधून घेत आहे.

हिना खान मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. नुकतंच हिनाने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केली आहे. यामध्ये हिनाच्या पायावर जखमाच्या खुणा दिसत आहेत. हिनाने फोटो पोस्ट करत, "मालदीवमध्ये आल्यानंतर निशाण आले आहे. हा फोटो पाहून चाहतेही चिंतेत पडले आहेत. पंरतू हे मालदीव व्हेकेशनचे फोटो असून मी पूर्णपणे बरी असल्याचं तिनं सांगितलं आहे. सध्या हिनाची तब्येत ठीक असून ती मालदीव एन्जॉय करत असल्याचं देखील तिने स्पष्ट केलं आहे.

हिनाने सोशल मीडियावर मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करतानाचे तिचे व्हिडीओ शेअर केले आहेत. पिवळ्या रंगाचा वनपीस फ्लोरल ड्रेस घालून हिना खानने समुद्रकिनारी फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये हिना खानने विग घातली असून डोळ्यावर गॉगल, लाइट मेकअप, टोपी आणि स्लीपर्स असा तिचा सिंपल अँड कूल अंदाज पाहायला मिळत आहे.हिनाने व्हिडीओमधून मालदीवचा स्विमिंग पूलचा सुंदर नजारा शेअर केला आहे. यामध्ये हिना पाण्यामध्ये पोहताना दिसत आहे. हिनाने ब्लॅक कलरचा स्विमसूट परिधान केला आहे. हिनाच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो आहे. सोशल मीडियावर हिनाच्या या व्हिडीओवर तुफान लाईक्स आले आहेत. तर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहे.

हिना खान टिव्हीची लोकप्रिय अभिनेत्री आहे. फक्त मालिकाच नाहीतर, वेबसीरिज आणि सिनेमांमध्ये देखील हिना हिने काम केलं आहे.‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेतून हिनाला खरी ओळख मिळाली आहे. या मालिकेमध्ये हिना अक्षराच्या भूमिकेत होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bareli Protest : बरेलीत नमाजावेळी मोठा गोंधळ, शेकडो आंदोलक रत्यावर उतरले; पोलिसांचा लाठीचार्ज

Vastu Tips Of Lighting Diya: घरात या दिशेला ठेवू नये पेटता दिवा, ओढवेल मोठं संकट

Washim Accident: वाशिममध्ये भीषण अपघात! १३ चिमुकल्यांना घेऊन जाणारी व्हॅन खड्ड्यात पलटली अन् पुढे...

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

SCROLL FOR NEXT