Ankita-Nia Dance SAAM TV
मनोरंजन बातम्या

Ankita-Nia Dance : बादशाहच्या गाण्यावर अंकिता लोखंडे अन् निया शर्मानं केला बेभान होऊन डान्स, पाहा व्हायरल VIDEO

Ankita Lokhande-Nia Sharma Dance Video : टिव्ही अभिनेत्री निया शर्मा आणि अंकिता लोखंडे यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दोघीही भन्नाट डान्स करताना दिसत आहे.

Shreya Maskar

'पवित्र रिश्ता' मालिकेतून प्रेक्षकांच्या घरोघरी पोहचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. 'पवित्र रिश्ता'नंतर अंकिताला 'बिग बॉस'मुळे खूप लोकप्रियता मिळाली आहे. सध्या तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये अंकितासोबत 'एक हजारों में मेरी बहना है' मधील अभिनेत्री निया शर्मा (Nia Sharma ) देखील पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये दोघी बेभान होऊन नाचताना दिसत आहेत.

निया शर्मा आणि अंकिता लोखंडेचा मित्र समर्थ जुरेल याचा नुकताच वाढदिवस पार पडला आहे. समर्थ जुरेल 'लाफ्टर शेफ' मध्ये पाहायला मिळाला. त्याने आपल्या सेलिब्रिटी मित्रांना बर्थडे पार्टी दिली. या पार्टीत टीव्हीचे अनेक कलाकार पाहायला मिळाले. या पार्टीला निया शर्मा आणि अंकिता लोखंडे दोन्ही देखील आल्या होत्या. त्यांच्या डान्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांचा डान्स करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यांच्या डान्सची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे.

निया शर्मा आणि अंकिता लोखंडेने बादशाहच्या 'वखरा स्वॅग' या पंजाबी गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. त्यांनी पार्टीसाठी खास वेस्टन लूक केला होता. दोघी बेभान होऊन नाचताना व्हिडीओत दिसत आहेत. त्यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. त्यांचा डान्सचा अंदाज पाहून सोशल मीडियावर त्यांना ट्रोल देखील करण्यात येत आहे.

समर्थची बर्थडे पार्टी त्याच्या मुंबईतला घरात होती. अंकिता लोखंडे तिचा नवरा विक्की जैन देखील पार्टीला आला होता. या पार्टीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अंकिता आणि निया शर्माचे चाहते त्यांच्या आगामी प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोयाबीनचे बियाणे विक्री करणाऱ्या 'बूस्टर' कंपनीविरोधात अमरावतीत गुन्हा

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

Weather Update: पावसाची विश्रांती, उन्हाचा चटका वाढला; राज्यात मान्सून कमकुवत का झाला? हवामान विभागानं कारण सांगितलं

SCROLL FOR NEXT