Shraddha Kapoor : श्रद्धाचा मराठमोळा स्वॅग! इन्स्टाग्रामच्या CEOला खाऊ घातली पुरणपोळी, पाहा VIDEO

Shraddha Kapoor Puran Poli Adam Mosseri : बॉलिवूडची अभिनेत्री श्रद्धा कपूरने इन्स्टाग्रामच्या CEOला पुरणपोळी खाऊ घातली आहे. याचा खास व्हिडीओ पाहा.
Shraddha Kapoor Puran Poli Adam Mosseri
Shraddha Kapoor SAAM TV
Published On

'स्त्री' फेम बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor ) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिच्या अभिनयाचे चाहते दिवाने आहेत. आजवर तिने अनेक हिट चित्रपट केले आहेत. आता नुकताच Waves Summit 2025 सुरूवात झाली आहे. या कार्यक्रमाला बॉलिवूडचे अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. याला इन्स्टाग्रामचे मुख्य कार्यकारी अधिकारी CEO अ‍ॅडम मोसेरी ( Adam Mosseri) यांनी देखील उपस्थिती लावली. तेव्हा श्रद्धा कपूरने त्यांच्याशी भन्नाट संवाद साधला.

श्रद्धा कपूरने इन्स्टाग्रामचे CEO अ‍ॅडम मोसेरी यांचा महाराष्ट्रीयन पाहुणचार केला आहे. याचा एक खास व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. श्रद्धा कपूर अ‍ॅडम मोसेरी यांना पुरणपोळी खाऊ घातली आहे. अ‍ॅडम मोसेरी यांच्यासोबत गप्पा सुरू होण्याआधी श्रद्धा कपूर अ‍ॅडम मोसेरी यांचे पुरणपोळी खाऊ घालून स्वागत केले. श्रद्धाने घरी बनवलेली पुरणपोळी खास अ‍ॅडम मोसेरी यांच्यासाठी घेऊन आली होती.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, श्रद्धा अ‍ॅडम मोसेरी यांनी म्हणते की, तुम्ही फॅन्सी ठिकाणी जेवता. तुम्ही भारतीय जेवणाची चव देखील चाखली आहे. पण मी तुमच्यासाठी एक महाराष्ट्रीयन गोड पदार्थ घेऊन आली आहे. तुम्ही माझ्या घरी बनलेली पुरणपोळी खाऊन पाहा. त्यानंतर अ‍ॅडम मोसेरीने पुरणपोळीचा आस्वाद घेतला. त्यांना पुरणपोळी खूपच आवडली. त्याने पुरणपोळीच्या गोडव्याचे कौतुक देखील केले.

श्रद्धा कपूरचा हा अंदाज चाहत्यांना खूपच आवडला आहे. श्रद्धा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. आपल्या प्रोजेक्टचे आणि ब्युटिफूल लूकचे फोटो ती कायम शेअर करत राहते. अभिनेत्री श्रद्धा कपूरचे 94.1 मिलियन फॉलोअर्स आहेत. श्रद्धा कपूरच्या आगामी प्रोजेक्टची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

Shraddha Kapoor Puran Poli Adam Mosseri
Zapuk Zupuk Movie Box Office Collection : सूरजला मिळाला गुलीगत धोका, सहाव्या दिवशी कमाईत झाली मोठी घट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com