
बॅालिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर ही नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. याच वर्षी तिचा हॅारर कॅामेडी सिनेमा स्त्री २ रिलीज झाला. या सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. या सिनेमाने बॅाक्स ऑफिसवर अनेक रेकॅार्डस तोडले. अभिनेत्री श्रद्धा कपूर पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक जीवनामुळे चर्चेत आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि स्क्रिन राइटर राहुल मोदी हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा अनेक काळापासून होत आहे. या दोघांना अनेकदा एकत्र स्पॅाट केले गेले. त्यातच श्रद्धा कपूरला पुन्हा एकदा तिच्या रुमर्ड बॅायफ्रेंड राहुल मोदी सोबत एका मोबाइलच्या दुकानात बघितले. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडीयावर सध्या व्हायरल होत आहे. या अगोदर हे दोघे अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या लग्नात दिसले होते. नुकत्याच एका इंटरव्हयूमध्ये श्रद्धाने आपण रिलेशिनशिपमध्ये असल्याचा खुलासा केला होता.
स्त्री २ सिनेमाच्या प्रोमोशन दरम्यान श्रद्धाने एका इंटरव्ह्यूमध्ये आपण सिंगल नसून रिलेशनशिपमध्ये असल्याचा खुलासा केला होता. त्यानंतर तिच्या आणि राहुल मोदीच्या अफेयरची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली होती. परंतु काही काळापूर्वी या दोघांनी एकमेकांना सोशल मीडिया प्लॅटफॅार्मवर अनफॅालो केले होते. त्यातच आता पुन्हा एकदा अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि स्क्रिन राइटर राहुल मोदी हे एका मोबाइलच्या दुकानात एकत्र दिसले. यावरुन हे दोघ रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये श्रद्धा निळ्या रंगाची डेनिम आणि सफेद रंगाचा टॅापमध्ये दिसत आहे. तर राहुलने ब्राउन शर्ट आणि ट्राउजर घातला आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे. यावर अनेकांनी वेगवेगळी प्रतिक्रिया दिली आहे. एका यूजरने लिहिले, 'इतनी भी क्या मजबूरी थी'. दुसऱ्या यूजरने लिहिले, 'दिल टूट गया'. तर एकाने लिहिले, हे , भगवान पुरुषांमध्ये तुझी पसंत कुठे आहे. यावेळी नेटकऱ्यांनी अनेक भावनात्मक आणि हास्यास्पद प्रतिक्रिया देखील दिल्या.
मीडिया वृत्तानुसार, अभिनेत्री श्रद्धा कपूर बॅालिवूडच्या प्रसिद्ध स्क्रिन राइटर राहुल मोदीला डेट करत आहे. श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी हे दोघ 'तू झुठी मै मक्कार' या सिनेमाच्या शुटिंग दरम्यान भेटले होते. राहुल मोदी बॅालिवूडमध्ये अनेक वर्षापासून स्क्रिनराइटर म्हणून काम करत आहे. राहुल मोदी 'तू झुठी मै मक्कार' या सिनेमात स्क्रिन राइटर म्हणून काम करत होता. सुरुवातीला या दोघांनी आपले रिलेशिनशिप मीडिया आणि चाहत्यांपासून लपवण्याचा प्रयत्न केला. या दोघांचे इंटरनेटवर अनेक फोटोज आहेत.
बॅालिवूडमधील या नवीन कपलने अद्याप आपल्या प्रेमाची कबुली दिली नाही. परंतु सोशल मीडियावर त्यांनी आपला एकत्र फोटो शेअर केला होता. तसेच श्रद्धाने R अक्षर असणारे पेंडेंट घालून सोशल मीडियावर फोटो शेअर केला होता. यानंतर हे गिफ्ट राहुलनेच दिले असणार अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली होती. मीडिया वृत्तानुसार, या दोघांच्याही कुटुंबाना त्यांच्या नात्याबद्दल माहित असून ते खूश आहेत. या दोघांना अनेकदा एकत्र पाहिले गेले. राहुल एक व्यावसायिक कुटुंबातून येतो याशिवाय तो बॅालिवूडमध्ये स्क्रिन राइटर म्हणून काम करत आहे. तर बॅालिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर हीचा शेवटचा सिनेमा स्त्री २ बॅाक्स ऑफिसवर सुपरहीट ठरला. यानंतर श्रद्धा ती आगामी सिनेमा 'नागिन'मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
Edited By: Priyanka Mundinkeri