Who is RJ Simran Singh : न संपणारा आनंद, ७ लाख फॉलोअर्स, फेमस RJ तरीही मृत्यूला कवटाळलं; कोण होती 'जम्मू की धडकन'?

Who is RJ Simran Singh : आरजे सिमरन अवघ्या 25 वर्षांत आत्महत्या करून या जगाचा निरोप घेतला. सिमरनचे चाहते आणि फॉलोअर्स तिच्या निधनाने दु:खी झाले आहेत. सिमरन ही मूळ जम्मूची रहिवासी होती.
RJ simran singh
RJ simran singhGoogle
Published On

Who is RJ Simran Singh : RJ सिमरन सिंहने वयाच्या 25 व्या वर्षी मृत्यूला कवटाळल आहे. गुरुग्राम पोलीस सिमरनच्या आत्महत्येचा तपास करत आहेत. सिमरनने इतक्या कमी वयात खूप प्रसिद्धी मिळवली होती. तिचे लाखो चाहते होते, तरीही त्यांने जीव संपवण्याचे पाऊल का उचलले? ती कोणत्याही तणावाखाली होती की तिला एखाद्या गोष्टीबद्दल दुःख होते? की आणखी काही होतं? या सर्व प्रश्नांचा शोध पोलीस घेत आहेत.

सिमरन सिंग गुरुग्रामच्या सेक्टर 47 मधील कोठी क्रमांक-59 मध्ये राहत होती. येथेच गुरुवारी सायंकाळी तिने आत्महत्या केली. सिमरन ही जम्मूतील नानक नगरची रहिवासी होती. तिने जम्मूच्या केंद्रीय विद्यापीठातून शिक्षण घेतले. या विद्यापीठातून तिला कॅम्पस प्लेसमेंट मिळाली आणि ती रेडिओ मिर्चीसाठी आरजे म्ह्णून काम करू लागली. संपूर्ण जम्मूला तिने तिच्या आवाजाची भुरळ घातली.तिला तिच्या आवाजामुळे बरीच प्रसिद्ध मिळाली होती. लोकांनी त्याला ‘द हार्टबीट ऑफ जम्मू’ असे नाव दिले होते. रेडिओ जॉकी असण्यासोबतच ती इंस्टाग्रामवर खूप मजेदार व्हिडिओ देखील पोस्ट करत असे, जे लोकांना खूप आवडले.

RJ simran singh
Pushpa 2 stamped : पुष्पा 2 प्रकरणात नवा ट्विस्ट ; यूट्यूबवरून हटवावं लागलं 'हे' गाणं

सिमरन सिंग अनेक ब्रँड्स सोबत काम करत होती. तसेच ब्रँडशी संबंधित रील्स देखील सिमरन तयार करायचीज्यावर हजारो लाईक्स तिला मिळत असत. मात्र २६ डिसेंबरच्या संध्याकाळी सिमरन मृत्यूला कवटाळून तिच्या चाहत्यांना मोठा धक्का दिला. एवढेच नाही तर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी सिमरनच्या निधनावर शोक व्यक्त केला.

RJ simran singh
Match Fixing The Nation At Stake : २६/११ नंतरची घटना आणि त्यामागील षडयंत्राचा होणार उलगडा

मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी शोक व्यक्त केला

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही सिमरनच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सच्या वतीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असे लिहिले आहे सिमरनच्या आत्म्याला शांती मिळो तिच्या निधनामुळे तिच्या घरच्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो अशी प्रार्थना त्यांनी केली आहे. ते पुढे निवेदनात म्हणाले, “सिमरनचा आवाज जम्मू आणि काश्मीरच्या आत्म्याशी जोडलेला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com